मुंबई - टाटा प्रोजेक्ट्स या अभियांत्रिकी कंपनीकडून देशातील रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांत विस्तार करण्यासाठी मदत करण्यात येत आहे. या प्रयत्नामधून देशाच्या विविध भागात २ हजार ३०४ खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत.
टाटा प्रोजक्ट्सचे चिफ स्ट्रॅट्जी ऑफिसर हिमांशू चतुर्वेदी म्हणाले, की देशातील पायाभूत क्षेत्रात सर्वात वेगाने वाढणारी व कौतुक झालेली टाटा प्रोजेक्ट्स कंपनी आहे. आमच्या कुशलतेचा वापर देशातील हॉस्पिटल नेटवर्क अद्ययावत करण्यासाठी व्हावा, असे आम्हाला वाटते. कोरोनाविरोधात लढण्यासाठी अनेक अभियंत्याचे गट, तंत्रकुशल कर्मचारी आणि कामगार अथकपणे काम करत आहेत.
हेही वाचा-कोरोनाच्या संकटातच आयबीएमच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या गेल्या नोकऱ्या
नुकतेच केईएम रुग्णालयात टाटाकडून दोन रुग्ण कक्षांमध्ये ६५ खाटा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या आहेत. केईएम रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक सेंटरला १५५ खाटांच्या विलगीकरण कक्षात बदलण्यात आले आहे. व्हेटिंलेटर्स, पल्स ऑक्सिमिटर, ऑक्सिजन फ्लो मीटर, फेशियल मास्क अशी वैद्यकीय साधने देण्यात आली आहेत. मुंबईमधील जोगेवश्वरीतल्या एचबीटी ट्रामा सेंटरमध्ये ७२ खाटांचे विलगीकरण सुविधा करण्यात येत आहे. याशिवाय कंपनी सेव्हन हिल्स हॉस्पिटल्स मरोळ, मुंबई येथे ३०० खाटांचे विलगीकरण सुविधा करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाची मदत करत आहे. हे एप्रिलपासून सुरू झालेले काम मे महिन्यात पूर्ण झाले आहे.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिगटाची आज होणार बैठक; 'या' विषयावर होणार चर्चा
टाटा प्रोजक्ट्सकडून उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे करोना रुग्णांसाठी १२४ खाटांची सुविधा करण्यात येणार आहे. तर उत्तर प्रदेशमधील जीबी नगर येथे १६८ खाटांची सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये आयसीयू, एचडीयू, आपत्कालीन आणि विलगीकरणाच्या खाटांचा समावेश आहे.
दरम्यान, कोरोनाची वाढत्या संख्येमुळे मुंबईत रुग्णालय खाटांची संख्या जास्त लागत आहे. अशा स्थितीत टाटाकडून मोलाची मदत केली जात आहे. यापूर्वी टाटाने हजारो कोटी रुपयांची कोरोनाच्या लढ्यात मदत केली आहे.