मुंबई: इक्विटी बेंचमार्क सेंसेक्स (Equity benchmark Sensex) गुरुवारी सुरुवातीला व्यवहारात 1100 अंकांनी म्हणजे 2 टक्क्यापेक्षा जास्त घसरला आहे. आशियाई बाजारात कमकुवत ट्रेड दरम्यान प्रमुख टायटन, विप्रो आणि एचडीएफसी ट्विन्समधील नुकसानीचा मागोवा घेतला. व्यापारी म्हणाले की, अमेरिकेच्या फेडरल रिजर्वने (US Federal Reserve's) लवकरच व्याज वाढवण्याचे संकेत आणि सलग परकीय फंडाचा प्रवाह यामुळे बाजारातील भावनांवर परिणाम झाला.
सुरुवातीच्या बाजारात बीएसई गेज 1155.61 अंक म्हणजेच 2 टक्याने घसरुन 56,702.54 वर येऊन व्यवहार करत होता. त्याचबरोबर निफ्टी 329.15 अंक म्हणजे 1.91 टक्याने घसरुन 16,948.80 वर बंद झाला. सेंसेक्स पॅकमध्ये टायटन 4.06 टक्के घसरुन अव्वलस्थानी होता. त्याच्यानंतर विप्रो, डॉ रेड्डीज, एचडीएफसी बैंक, टेक महिंद्रा आणि इंफोसिस होते. दुसरीकडे मारुती आणि एनटीपीसीला लाभ झाला. प्रजासत्ताक दिना निमित्त बुधवारी इक्विटी, फॉरेक्स आणि सराफा बाजार बंद राहीले.
मंगळवारी 30 शेअर्सवाला बीएसई सेंसेक्स 366.64 किंवा 0.64 टक्याच्या वेगाने 57,858.15. बेद झाला होता. त्याचबरोबर व्यापक एनएसई निफ्टी 128.85 अंकावर किंवा 0.75 टक्याने वाढून 17,277.95 वर बंद झाला. यूएएस फेडने बुधवारी सांगितले की, महागाईशी सामना करण्यासाठी मार्चमध्ये व्याज दर वाढले जाऊ शकते. आशियात आणि दुसरीकडे शंघाई, हांगकांग, सियोल आणि टोकीयो मध्ये शेयर्स मधल्या सत्रातील व्यावाहारत मोठ्या नुकसानीसोबत व्यवहार करत होते. अमेरिकेतील शेअर बाजार (US stock market) रात्रीच्या सत्रात संमिश्र कलसह बंद झाले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड (International oil benchmark Brent crude) 0.93 टक्क्यांनी वाढून 89.12 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) मंगळवारी भांडवली बाजारात निव्वळ विक्री करणारे होते. त्यांनी तात्पुरत्या आकडेवारीनुसार 7,094.48 कोटी रुपये काढले.