नवी दिल्ली - एचडीएफसीला तारण ठेवलेले बीआरएच वेल्थ क्रियटरचे शेअर विकणे महागात पडले आहे. नियमभंग केल्यामुळे सेबीने एचडीएफसी बँकेला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच एचडीएफसीला १५८.६८ कोटी रुपये प्रति वर्षी ७ टक्के दराने इस्क्रो अकाउंटमध्ये जमा करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत.
सेबीने दिलेल्या अंतिरम आदेशानुसार एचडीएफसीने बीआरएच वेल्थ क्रियटरकडून कर्ज वसूल करण्यासाठी त्यांचे शेअर विकले होते. मात्र, सेबीने दिलेले अंतिरम आदेश हे कर्जवसुलीसाठी अंतिम आदेश नव्हते. अंतिरम आदेशामागे फॉरेन्सिक ऑडिट होईपर्यंत बीआरएच हेल्थच्या खरेदी-विक्रीवर बंधन आणणे हा सेबीचा उद्देश होता. त्यामधून गुंतवणुकदारांचे हित जोपासणे हादेखील सेबीचा उद्देश होता.
हेही वाचा-बजाज ऑटोच्या नफ्यात डिसेंबरच्या तिमाहीत २३ टक्क्यांची वाढ
सेबीने एचडीएफसीला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम एचडीएफसी बँकेला ३५ दिवसात भरावी लागणार आहे. एचडीएफसीने या प्रकरणाची माहिती आरबीआयला द्यावी, असेही सेबीने आदेश दिले आहेत.
हेही वाचा-दिल्ली-एनसीआरमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा उद्योगांना ५० हजार कोटींचा फटका
नवीन क्रेडिट कार्ड लाँच करण्यावर आरबीआयचे एचडीएफसी बँकेवर निर्बंध
एचडीएफसी बँकेच्या आगामी डिजीटल व्यावसायिक उपक्रम आणि नवीन क्रेडिट कार्डच्या लाँचिंगवर भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर २०२० मध्ये निर्बंध लागू केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून एचडीएफसीच्या डाटा सेंटरमधील कामावर परिणाम झाला होता. त्यामुळे आरबीआयने ही कारवाई केली आहे.