नवी दिल्ली - पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी कपात झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलचा दर प्रति लिटर २४ पैशांनी तर डिझेलचा दर २७ पैशांनी कमी झाले आहेत.
दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७२.४५ रुपये आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर ७५.१३ रुपये, कोलकात्यात ७५.१३ रुपये तर चेन्नईत ७५.२७ रुपये आहे. डिझेलचा दिल्लीत दर प्रति लिटर ६५.४३ रुपये आहे. मुंबईत डिझेल प्रति लिटर ६८.५७ रुपये, कोलकात्यात ६७.८९ रुपये आणि चेन्नईत ६९.१० रुपये असल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन वेबसाईटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा-उद्योगपती अनिल अंबानी दिवाळखोरीच्या मार्गावर; चीनी बँकांचे कर्ज फेडण्यास असमर्थ
फेब्रुवारीत पेट्रोल दिल्लीत प्रति लिटर ८२ पैसे तर डिझेल ८५ पैशांनी स्वस्त झाले आहे. चीनमधील कोरोना विषाणूमुळे खनिज तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारात कमी मागणी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर प्रति बॅरल १ टक्क्याने घसरले आहेत. मागील सत्रात खनिज तेलाच्या प्रति बॅरलची किंमत ही १.१२ टक्क्यांनी घसरून ५४.५० डॉलर झाली होती.
हेही वाचा-कोरोना विषाणूचा परिणाम; शिंक चीनला अन् सर्दी जगाला...