ETV Bharat / business

रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रश्नच नाही - रेल्वेमंत्री पियूष गोयल - Raibareli

गेल्या पाच वर्षात रेल्वे मार्ग हा ८९,९१८ किमीवरून १ लाख २३ हजार २३६ किमी वाढविण्यात आल्याचे पियूष गोयल यांनी संसदेमध्ये सांगितले.  रेल्वेचे खासगीकरण होवू शकत नाही. मात्र सुविधा वाढवायच्या असतील तर गुंतवणुकीची अधिक आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

पियूष गोयल
author img

By

Published : Jul 12, 2019, 6:30 PM IST

नवी दिल्ली - रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी रेल्वेच्या खासगीकरणाची शक्यता उडवून लावली आहे. ते संसदेमध्ये मागण्यावरील मंजुरीबाबत बोलत होते. रेल्वे मंत्रालयाकडून नवे मार्ग आणि प्रकल्पासाठी राष्ट्रहित लक्षात घेवून गुंतवणुकदारांना आमंत्रित केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या पाच वर्षात रेल्वे मार्ग हा ८९,९१८ किमीवरून १ लाख २३ हजार २३६ किमी वाढविण्यात आल्याचे पियूष गोयल यांनी संसदेमध्ये सांगितले. रेल्वेचे खासगीकरण होवू शकत नाही. मात्र सुविधा वाढवायच्या असतील तर गुंतवणुकीची अधिक आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही खासगी-सरकारी भागीदारीला प्रोत्साहन द्यायचे ठरविले आहे. तसेच काही कामांचे कॉर्पोरेटकरण करण्यात येईल, अशी त्यांनी रेल्वे मंत्रालयाची भूमिका सभागृहाला सांगितली.
चहा विक्रेत्याने लहानपणी रेल्वेसमोर चहा विकताना हा देश पाहिला. तसेच त्याने रेल्वेचे महत्त्व ओळखले, असेही गोयल यांनी सूचकपणे सांगत रेल्वेच्या खासगीकरणाच्या विषयाला पूर्णविराम दिला.

गोयल यांचा सोनिया गांधींवर निशाणा-
काँग्रेसच्या काळात रायबरेलीमधील आधुनिक बोगी कारखान्यात एकाही बोगीची निर्मिती झाली नाही. या कारखान्यात भाजप सत्तेत आल्यानंतर पहिल्या बोगीची निर्मिती ऑगस्ट २०१४ मध्ये झाली. विजयी आणि पराजयीमध्ये केवळ एकच फरक असतो. पराजयी होणारे अडचणींकडे पाहतात, तर विजयी असणारे ध्येयाकडे पाहतात, असे गोयल म्हणाले.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेत रायबरेलीचे खासगीकरण करू नये, अशी मागणी केली होती. सोनिया गांधी या रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.

रेल्वे मंत्रालयाने लखनौ ते दिल्ली या मार्गाची रेल्वे सेवा खासगी कंपनीला चालविण्याला देण्याचा नुकतेच निर्णय घेतला आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालय निविदाही काढणार आहे.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.