नवी दिल्ली - व्हॉट्सअपने गोपनीयतेच्या बदललेल्या धोरणावरून होणाऱ्या टीकेवर स्पष्टीकरण दिले आहे. व्हॉट्सअपवर शेअर होणाऱ्या डाटाबाबत कोणतेही धोरण बदलले नसल्याचे फेसबुकने म्हटले आहे.
व्हॉट्सअपने नुकतेच गोपनीयतेचे धोरण आणि अटीच्या बदलल्या आहेत. त्यामध्ये डाटावर करण्यात येणारी प्रक्रिया आणि फेसबुकसह माहिती एकत्रित करण्याचा समावेश आहे. वापरकर्त्यांना ८ जानेवारी २०२१ पर्यंत अटी मान्य केल्या तरच व्हाट्सअपच्या सेवा मिळू शकणार असल्याचेही नोटिफेकेशनमध्ये म्हटले होते. त्यावरून फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या सेवेबाबत समाजमाध्यमातून टीका होत आहे. अनेक वापरकर्त्यांनी सिग्नल आणि टेलिग्रामचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सिग्नल आणि टेलिग्रामचा वापर वाढला आहे.
हेही वाचा-'अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची होण्याकरता देशाकडून सुधारणा'
टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनीही सिग्नलचा वापर करा असे ट्विट केले होते. व्हाट्सअपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी टीकेला उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, कंपनीने अधिक पादर्शक आणि बिझनेस फीचर देण्यासाठी पर्याय दिला आहे. पुढे त्यांनी म्हटले की, हे स्पष्ट आहे, व्हाट्सअपवरील डाटा फेसबुकवर शेअर करण्यासाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच वापरकर्ते खासगी आणि मित्रांशी अथवा कुटुंबांशी करत असलेल्या संवादावरही परिणाम होणार नाही.
हेही वाचा-इलॉन मस्क ठरले जगातील सर्वाधिक श्रीमंत; जेफ बेझोसला टाकले मागे
व्हॉट्सअपवरील संभाषण हे इन्ड टू इन्ड इन्क्रिप्ट आहे. त्यामुळे फेसबुकसह कोणतीही कंपनी हे खासगी चॅट अथवा कॉल पाहू शकत नाही.
व्हॉट्सअपच्या नवीन पॉलिसीतील प्रमुख बाबी अशा -
- व्हॉट्सअप सेवा आणि डेटावर प्रक्रिया कशी केली जाते.
- व्यवसाय व्हॉट्सअप चॅट संचयित आणि व्यवस्थापित करण्यासाठी फेसबुक होस्ट केलेल्या सेवा कशा वापरू शकतात.
- व्हॉट्सअॅप फेसबुक कंपनीच्या उत्पादनांमध्ये एकत्रीकरण करण्यासाठी फेसबुकबरोबर भागीदारी कशा प्रकारे करेल.
- या नवीन बाबी 8 फेब्रुवारीपासून लागू होतील.