सॅनफ्रान्सिस्को - टेस्लाचे संस्थापक आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी आज नवा इतिहास रचला आहे. टेस्लाच्या वाहनांच्या विक्रीत फारशी समाधानकारक नसतानाही ते जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्समध्ये मागे टाकले आहे.
टेस्लाचे शेअर गुरुवारी ४.८ टक्क्यांनी वाढले. त्याचा परिणाम म्हणून मस्क यांची संपत्ती जेफ बेझोस यांच्यापेक्षा १.५ अब्ज डॉलरने वाढली आहे. जेफ यांची एकूण संपत्ती सुमारे १८८.५ अब्ज डॉलर आहे. जेफ हे ऑक्टोबर २०१७ पासून आजवर जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
हेही वाचा-स्टेट बँकेकडून गृहखरेदी करणाऱ्यांना दिलासा; व्याज दरात कपात
अंतराळात नागरी संस्कृती रुजविणे हा उद्देश-
मस्क यांची गतवर्षी १५० अब्ज डॉलरहून अधिक वाढली आहे. तर टेस्लाचे शेअरची किंमत ७४३ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. मानवी उत्क्रांतीला प्रोत्साहन देत अंतराळात नागरी संस्कृती रुजविणे हा संपत्तीचा उद्देश असल्याचेही मस्क यांनी म्हटले होते.
हेही वाचा-भन्नाट! भारतीय भाषांमध्ये मोफत डोमेन रजिस्टर करता येणार
टेस्लाचे वाहन विक्रीचे उद्दिष्ट थोडक्यात हुकले...
गतवर्षी जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या संपत्तीत १.८ लाख कोटी डॉलरची वाढ झाल्याचे ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सने म्हटले आहे. टेस्लाने गतवर्षी ग्राहकांना ४,९९,५५० वाहने दिली आहेत. कंपनीने गतवर्षी ५ लाख वाहन विक्रीचे ठेवलेले उद्दिष्ट थोडक्यात हुकले होते. टेस्ला यांनी ट्विट करत टीमचे कौतुक केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, टेस्लाच्या टीमचा अभिमान आहे. त्यांनी मैलाचा दगड असलेला बहुतांश टप्पा पार केला आहे. जेव्हा टेस्ला सुरुवात केली होती, तेव्हा १० टक्के टिकण्याची शक्यता आहे, असे वाटले होते.