लखनौ - उत्तर प्रदेश सरकारने तरुणांना रोजगार देण्यासाठी 'मिशन रोजगार' ५ डिसेंबरला लाँच केले आहे. या मिशनमधून मार्च २०२१ पर्यंत ५० लाख रोजगार देण्याचे उत्तर प्रदेश सरकारने उद्दिष्ट निश्चित केले आहे. योगी सरकारने २१ लाख ७५ हजार ४४३ हजारांना रोजगार दिला आहे.
मिशन रोजगार मोहिमेत आउटसोर्सिंग, काँट्रेक्टिंग, स्कील ट्रेनिंग आणि स्वयंरोजगार यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश राज्याची विविध विभागे, औद्योगिक विकास प्राधिकरण, आयोग, मनपा, परिषद, मंडळ, खासगी कंपन्या आणि संस्था रोजगार मोहिमेत सहभागी होणार आहेत.
सूक्ष्म, लघू आणि मध्यम (एमएसएमई) क्षेत्र, पंचायत राज, स्पोर्ट्स, मत्सपालन, सार्वजनिक बांधकाम विभाग यामधून लक्षणीय रोजगार निर्मिती झाल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून विविध कार्यक्रम व जनजागृती जिल्हापातळीवर करण्यात येत आहे. तसेच माहिती विभागाकडून कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली जाणार आहे. स्थानिक पातळीवर एमएसएमई क्षेत्रातून कमी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; सरकारी कंपन्यांचे 'थांबा आणि वाट पाहा'चे धोरण
कोरोनाच्या काळात रोजगाराबाबत चिंता
जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन केलं. या लॉकडाऊनच्या काळात कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. 'आशिया पॅसफिक इम्प्लॉयमेंट आणि सोशल आऊटलुक २०२०' या अहवालानुसार ८१ दशलक्ष लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना चिंताजनक बातमी समोर आली आहे. येत्या पाच वर्षापर्यंत ८५ कोटी लोकांचे रोजगार हे मशिन घेणार आहेत. ही माहिती जागतिक आर्थिक मंचाच्या अहवालात देण्यात आली आहे.
हेही वाचा-मेक इंडियाला प्रोत्साहन देण्याकरता सरकारकडून ४० हजार कोटींची कंत्राटे रद्द