रायपूर - गॅस सिलिंडर महागल्याने त्रस्त झालेल्या ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी होणार असल्याची शक्यता केंद्रीय अर्थमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली. ते स्वामी विवेकानंद विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान हे दोन दिवसीय छत्तीसगडच्या दौऱ्यावर आले आहेत. गॅस सिलिंडरच्या वाढत असल्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, सतत एलपीजीच्या किमती वाढत आहेत, हे सत्य नाही. आंतरराष्ट्रीय बाजारामुळे या महिन्यात किमती वाढल्या आहेत. असे असले तरी, पुढील महिन्यात किमती कमी होणार असल्याची चिन्हे आहेत. हिवाळ्यात एलपीजीचा वापर वाढत असल्याने क्षेत्रावर दबाव होतो. पुढील महिन्यात सिलिंडरच्या
हेही वाचा- सोने महागले! जाणून घ्या, कारण...किमती कमी होणार आहेत.
मागील आठवड्यात विनाअनुदानित सिलिंडरची किंमत १४४.५ रुपयाने वाढली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरसाठी सरकारने सुमारे दुप्पट अनुदान वाढविले आहे.
हेही वाचा- सोन्याच्या आयातीत एप्रिल-जानेवारीत ९ टक्क्यांची घसरण