ETV Bharat / business

जपानकडून जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेनची चाचणी - ALFA X

सर्वात वेगवान धावणारी अल्फा-एक्स बुलेट रेल्वे ही शिनाकॅनासेन रेल्वेची सुधारित आवृत्ती आहे.  ही बुलेट रेल्वे चीनच्या फक्सिंग रेल्वेहून प्रति ताशी १० किमी अधिक वेगाने धावते.

बुलेट ट्रेन
author img

By

Published : May 11, 2019, 4:55 PM IST

टोकियो - जगातील सर्वात वेगवान बुलेट रेल्वेची जपानने चाचणी घेतली आहे. ही रेल्वे ताशी ४०० किलोमीटर वेगाने धावते. या चाचणीमुळे वेगवान प्रवासाची क्रांतिकारक संकल्पना अस्तित्वात येणार आहे.

सर्वात वेगवान धावणारी अल्फा-एक्स बुलेट रेल्वे ही शिनाकॅनासेन रेल्वेची सुधारित आवृत्ती आहे. ही बुलेट रेल्वे चीनच्या फक्सिंग रेल्वेहून प्रति ताशी १० किमी अधिक वेगाने धावते. त्यामुळे चीनच्या बुलेट रेल्वेला जपानची बुलेट रेल्वे वेगात मागे टाकणार आहे. ही रेल्वे २०३० मध्ये कार्यान्वित होणार आहे. भविष्यात ही रेल्वे सेंडाई आणि ओमोरी शहरामध्ये धावणार आहे. त्यासाठी मध्यरात्रीदरम्यान चाचणी घेण्यात येणार आहे.

जपानच्या वेगवान शिनकॅनसेन एन ७०० एस रेल्वेची वर्षभरापूर्वी चाचणी घेण्यात आली आहे. ही ३०० किमी प्रति ताशी वेगाने धावते. ती प्रत्यक्षात २०२० मध्ये सुरू होणार आहे. या रेल्वेलाही वेगात अल्फा एक्सने मागे टाकले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.