नवी दिल्ली - भारत आणि आफ्रिकेमध्ये व्यापार आणि गुंतवणुकीच्या प्रचंड संधी आहेत. दोन्ही देशांमध्ये एकूण २.५ अब्ज लोक असल्याचे आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने म्हटले आहे.
आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने इंडो-आफ्रिका व्हर्चुल समिट २०२० मध्ये तीन दिवसीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेत दोन्ही देशांमध्ये आर्थिक संबंध दृढ करण्यावर चर्चा झाली. त्यावेळी बोलताना आयएमसी चेंबरचे अध्यक्ष राजीव पोदार म्हणाले, की भारत आणि आफ्रिका हे देश एकत्रित येऊन जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतात. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणुकीसाठी दडलेली क्षमता आहे. दोन्ही द्विपक्षीय व्यापारामधून १०० अब्ज डॉलरचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आहे. तर १०० अब्जची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट आहे. आफ्रिकन कंटिन्टमेंट फ्री ट्रेड एरिया (एफसीएफटीए) या संस्थेला दोन्ही उपखंडामध्ये मुक्त व्यापार करण्याची इच्छा आहे.
चालू आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीत ९.६ टक्क्यांची घसरण होईल-
देशाच्या सकल उत्पादनात (जीडीपी) चालू आर्थिक वर्षात ९.६ टक्क्यांची घसरण होईल, असा जागतिक बँकेने अंदाज व्यक्त केला आहे. कोरोना महामारीत देशभरात लागू केलेली टाळेबंदी आणि उत्पन्न कमी झाल्याचा कुटुंबांसह कंपन्यांना धक्का बसला आहे. भारताची अर्थव्यवस्था कधी नव्हे अशी अत्यंत वाईट झाल्याचे जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे.