ETV Bharat / business

केंद्रीय अर्थसंकल्प ही जादुगाराची आभासी कल्पना ठरणार-काँग्रेसचा दावा - P Chidambaram slammed modi gov over budget

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करत मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की आम्हाला सरकारकडून अर्थसंकल्पाबाबत अपेक्षा नाहीत. आम्ही अर्थव्यवस्थेचे मूल्यांकन करणार आहोत.

काँग्रेसची मोदी सरकारवर टीका
काँग्रेसची मोदी सरकारवर टीका
author img

By

Published : Jan 28, 2021, 7:48 PM IST

नवी दिल्ली - देशाच्या अर्थव्यवस्थेवरून काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ हा जादुगाराची आभासी कल्पना ठरणार असल्याचा दावा काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश आणि मल्लिकार्जून खरगे उपस्थित होते.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करत मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की आम्हाला सरकारकडून अर्थसंकल्पाबाबत अपेक्षा नाहीत. आम्ही अर्थव्यवस्थेचे मूल्यांकन करणार आहोत. सरकारला कितीही चांगला सल्ला दिला तरी त्याकडे दुर्लक्ष करणार आहेत, हे आम्हाला माहित आहे. आर्थिक धोरणाचे काय वाईट परिणाम होतात, याबाबत काळजी करणार नाहीत, असेही चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

हेही वाचा-जिओ ठरला जगातील सर्वात पाचवा मजबूत ब्रँड!

महामारी नसतानाही अर्थव्यवस्थेच्या विकासदरात घसरण सुरू होती. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या तिमाहीत आणि सलग आठ तिमाहीत विकासदरात घसरण झाली आहे. त्यामुळे महामारीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासदरात २३.९ टक्के घसरण झाली आहे. तर दुसऱ्या तिमाहीत विकासदरात ७.५ टक्के घसरण झाली आहे.

हेही वाचा- 'दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा विचार करत अर्थसंकल्प सादर व्हावा'

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये विकासदरात घसरण होणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केलेले आकड्यांचे कोणतेही उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री नव्या रुपात, सुधारित अंदाजित आकडेवारी ही २०२०-२१ साठी सादर करतील, अशी आम्हाला भीती आहे. त्यामधून २०२१-२२ साठी आकर्षक माहिती सादर करण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशीही भीती असल्याचे पी. चिदंबरम यांनी म्हटले. वर्ष २०२१-२२ चा अंदाजित अर्थसंकल्प ही जादुगाराची आभासी कल्पना ठरणार असल्याचेही त्यांनी टीका केली.

देशाच्या आर्थिक स्थितीसाठी एकमेव केंद्र सरकार जबाबदार आहे. मोदी सरकारने सात वर्षात अर्थव्यवस्थेचा कणा आणि समृद्ध विकासदराचा कणा मोडल्याचीही चिदंबरम यांनी टीका केली आहे.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.