नवी दिल्ली - टेक्नो या ग्लोबल प्रिमीयम स्मार्टफोन कंपनीने नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. स्पार्क 7 या स्मार्टफोनचे नाव आहे. त्यामध्ये मोठा डिस्प्ले, दणकट बॅटरी, मोठा स्क्रीन आणि एआयचा सपोर्ट असलेला ड्यूल कॅमेरा सेटअप आहे.
टेक्नो कंपनीकडून मेक इन इंडियावर भर देण्यात येणार आहे. मध्यम परवडणाऱ्या दरात स्मार्टफोन उपलब्ध करण्यात येणार असल्याचे ट्रान्सशिन इंडियाचे सीईओ अर्जित तालपत्र यांनी सांगितले.
हेही वाचा-लशीचा तुटवडा; भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचे वाढविणार उत्पादन
टेक्नो स्पार्क 7 ची वैशिष्ट्ये
- टेक्नो स्पार्क 7 मध्ये दोन श्रेणी आहेत. 2GB+32GB या श्रेणीतील स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये आहे. तर 3GB+64GB श्रेणीतील स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये आहे. हे स्मार्टफोन स्पूर्स ग्रीन, मॅग्नेट ब्लॅक आणि मॉरफस ब्ल्यू या रंगामध्ये उपलब्ध आहेत.
- स्मार्टफोन हे अॅमेझॉनवर 16 एप्रिलपासून दुपारी 12 नंतर उपलब्ध होणार आहेत.
- स्मार्टफोन स्पोर्ट्समध्ये 6.52 इंच एचडी+ डॉट नॉच डिस्प्लेसह 720 x 1600 रिझोल्यूशन उपलब्ध आहे.
- स्मार्टफोनमध्ये 90.34 टक्के बॉडी स्क्रीन रेशो आहे. तर 20:9 टक्के अॅस्पेक्ट रेशो आहे. त्यामध्ये 480 निट्स उज्जवलता आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना दृष्टीला चांगला अनुभव येतो.
- स्पार्क 7 मध्ये 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि क्वाड फ्लॅश आहे.
- एफ/1.8 अॅपेर्ट्यूर या फीचरमुळे फोटो अधिक सुस्पष्टपणे काढणे शक्य होते.
- टाईम लॅप्स व्हिडिओ, स्लो मोशन व्हिडिओ, बोकेह मोड, एआय ब्यूटी मोड आणि एआय पोर्ट्रेट मोड हे फोटोग्राफीचा चांगला अनुभव घेण्यासाठी प्रिमियम फीचर देण्यात आले आहेत.
- 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे.
- स्मार्टफोनमध्ये 6000 एमएएचची दणकट बॅटरी आहे. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर 41 दिवस स्टँडबाय, 42 तास कॉलिंग, 17 तास वेब ब्राऊझिंग, 45 तास म्यूझिक प्लेबॅक व 27 तास व्हिडिओ प्लॅबॅक चालू शकते.
- बॅटरीमध्ये एआय फीचर असल्याने बॅटरीची उर्जा वाचते. संपूर्ण बॅटरी चार्ज झाल्यानंतर आपोआप विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते.
- स्मार्टफोन 7 (3GB+64GB) ही एचआयओएस 7.5 ही ऑपरेटिंग सिस्टिम अँड्राईड 11 वर चालते. त्यामध्ये ओक्टा कोअर 1.8 जीएचझेड सीपीयू हेलिओ ए25 प्रोसेसर आहे.
हेही वाचा-मिनी टाळेबंदीने सणासुदीत होणाऱ्या वाहन विक्रीवर होणार परिणाम -इक्रा