नवी दिल्ली - आर्थिक गुन्हेगार असलेल्या उद्योगपती विजय मल्ल्याला सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दणका दिला आहे. ईडीने मनी लाँड्रिग प्रकरणात मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
ईडीच्या सूचनेप्रमाणे फ्रान्समधील यंत्रणेने विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेची किंमत १४ कोटी रुपये असल्याचे ईडीने म्हटले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून विजय मल्ल्याच्या आर्थिक गैरव्यवहारांचा तपास केला जात आहेत. ६४ वर्षीय मल्ल्याने ९ हजार कोटी रुपयांचे बँकेचे कर्ज बुडविले आहे. त्याच्याविरोधात इंग्लंडमध्ये गोपनीय कायदेशीर प्रक्रिया केल्याशिवाय प्रत्यार्पण होऊ शकत नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ५ ऑक्टोबरला म्हटले होते.
हेही वाचा-कॉर्पोरेटला बँकिंग परवाने देण्याची अंतर्गत समितीची केवळ सूचना-शक्तिकांत दास
दरम्यान, काही गोपनीय व कायदेशीर सुटल्याशिवाय विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण होऊ शकत नसल्याचे इंग्लंडचे उच्चायुक्त जॅन थॉम्पसन यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते. दरम्या, ईडीने विजय मल्ल्यावर मनी लाँड्रिग प्रकरणात २०१६ मध्ये गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने मल्ल्यासह त्याची कंपनी आणि इतरांविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपपत्र दाखल केले आहे.
हेही वाचा-पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या तोंडावर आरबीआय सक्रिय; १९४ चिट फंडचा करणार नव्याने तपास
थकित कर्जाचे पैसे माघारी देऊन खटला बंद करण्याची मागणी-
मद्यसम्राट विजय मल्ल्या याने काही महिन्यांपूर्वी भारत सरकारकडे थकित कर्जाचे पैसे माघारी देऊन खटला बंद करण्याची मागणी केली होती. बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवल्यामुळे आणि मनीलॉड्रींगचा गुन्हा दाखल झाल्याने मल्ल्या इंग्लडला पळून गेला आहे. इंग्लडहून प्रत्यर्पण (दुसऱ्या देशातून माघारी आणण्याची प्रक्रिया) करण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असून विजय मल्ल्या कायदेशीर लढाई लढत आहे. त्याने कोविड-१९ पॅकेजसाठी भारत सरकारचे उपहासात्मक अभिनंदन केले होते. सरकार हवा तितका पैसा छापू शकते, असे त्याने म्हटले होते.