ETV Bharat / business

डिझेल प्रति लिटर १७ ते १८ पैशाने महाग; पेट्रोल दर स्थिर

author img

By

Published : Dec 28, 2019, 12:50 PM IST

मुंबईत डिझेल प्रति लिटर ७०.७३ रुपये तर चेन्नईत ७१.२३ रुपये आहे.  गेल्या तीन दिवसात डिझेलच्या किमती ४० पैशांनी वाढल्या आहेत. पेट्रोलचे दर महानगरामध्ये स्थिर राहिले आहेत.

Diesel rate hike
इंधन दरवाढ

नवी दिल्ली - देशातील बहुतांश शहरात डिझेलच्या किमती प्रति लिटर १७ ते १८ पैशांनी वाढल्या आहेत. तर पेट्रोलचे दर स्थिर राहिले आहेत.

डिझेलचा दर दिल्लीत प्रति लिटर ६७.४१ रुपये आहे. तर कोलकातामध्ये डिझेलचा दर प्रति लिटर ६९.८३ रुपयावर पोहोचला आहे. मुंबईत डिझेल प्रति लिटर ७०.७३ रुपये तर चेन्नईत ७१.२३ रुपये आहे. गेल्या तीन दिवसात डिझेलच्या किमती ४० पैशांनी वाढल्या आहेत. पेट्रोलचे दर महानगरामध्ये स्थिर राहिले आहेत.

हेही वाचा-जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या व्यापार बातम्यांचा आढावा

दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७४.७४ रुपये, कोलकातामध्ये ७७.४० रुपये, मुंबईत ८०.४० रुपये तर चेन्नईत ७७.४० रुपये आहे. हे दर स्थिर राहिले आहेत. सरकारी तेल विपणन कंपन्यांकडून रोज पेट्रोल व डिझेलच्या किमतीचा आढावा घेतला जातो. पेट्रोल-डिझेलचे दर जागतिक बाजारपेठेत वाढले आहेत. त्यामुळे सरकारी कंपन्यांनी दर वाढवले आहेत.

हेही वाचा-काही दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला गती

काही दिवस दर स्थिर राहिल्यानंतर गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले होते. देशातील मोठ्या शहरात पेट्रोलचे दर ५ ते ६ पैशांनी वाढले होते. तर डिझेलचे दर १० ते ११ पैशांनी वाढले होते.

खनिज तेल विपणन कंपन्यांनी प्रिमिअम पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव सरकारने मंजूर केला तर प्रिमिअम पेट्रोल हे प्रति लिटर ०.८० रुपयाने वाढणार आहे. तर डिझेल प्रति लिटर १.५० रुपयाने वाढणार आहे. हे वाढीव शुल्क येत्या पाच वर्षासाठी लागू होईल.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.