नवी दिल्ली - कोरोनामुळे विमान कंपन्यांनी धसका घेतला आहे. कोरोनाचा जगभरातील प्रसार पाहता गोएअरने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत.
आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे १७ मार्च ते १५ एप्रिल २०२० पर्यंत रद्द करण्यात आल्याचे गो एअर इंडियाने म्हटले आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील देशांनी मागदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचा मोठा फटका विमान वाहतूक उद्योगाला बसला आहे. अनेक महत्त्वाचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. तर अनेक ग्राहकांनी प्रवासाचे नियोजन पुढे ढकलल्याचे गोएअरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
हेही वाचा-शेतकरी अडचणीत : ‘सीसीआय’ची तीन आठवड्यांपासून कापूस खरेदी बंद
सर्व देशांनी प्रवास बंदी लागू केल्याने गोएअर इंडियाला तात्पुरत्या काळासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या देशांमधून भारतात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच देशातील प्रवाशांना कोरोनाचे रुग्ण असलेल्या देशांमध्ये जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा-...तर सर्व दूरसंचार कंपन्यांच्या व्यस्थापकीय संचालकांना तुरुंगात पाठवू- सर्वोच्च न्यायालय
संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान आणि कुवेतमधून येणाऱ्या प्रवाशांना विलिगीकरण कक्षात किमान १४ दिवसांसाठी ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय आजपासून लागू करण्यात आला आहे.