नवी दिल्ली - बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर फोर्च्युन कंपनीने खाद्यतेलाची जाहिरात थांबवली आहे. या जाहिरातीत गांगुलीने काम केले होते.
सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने अँजिओप्लास्टी करावी लागली आहे. त्याच्या आजारपणाच्या वृत्तानंतर समाज माध्यमातून फोर्च्युन कंपनीच्या खाद्यतेलाच्या जाहिरातीवर काहींनी टीका केली आहे. गांगुलीने अदानी विलमार ग्रुपच्या राईस ब्रॅन खाद्यतेलाची जाहिरात केली आहे. गांगुलीची तब्येत सध्या सामान्य आहे. सौरव गांगुली हा फोर्च्युनचा ब्रँड अँबेसेडर आहे. काही दिवसानंतर तो पुन्हा जाहिरातीत झळकणार असल्याचे फोर्च्युन कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-स्टेट बँकेचे ३ हजार एटीएम मार्चपर्यंत सुरू होणार
अदानी विलमारचे डेप्युटी सीईओ अँग्शू मॅलिक म्हणाले की, आम्ही सौरव गांगुलीबरोबर काम सुरू ठेवणार आहोत. यापुढेही सौरव हा ब्रँड अॅम्बिसिडर असणार आहे. आम्ही टीव्हीवर तात्पुरती जाहिरात थांबवली आहे. अशी घटना कोणाबरोबरही घडणे दुर्दैवी आहे. ते म्हणाले की, आयटी अधिकारी हा व्यायाम करताना ट्रेडमिलवरून कोसळला. याचा अर्थ ट्रेडमिल हे वाईट असा अर्था होत नाही. राईस ब्रान हे खाद्यतेल जगातील सर्वाधिक आरोग्यदायी आणि नॅचरल अँटीऑक्सिडंट आहे.
हेही वाचा-मुंबई शेअर बाजारासह निफ्टीचा नवा उच्चांक
सेलिब्रिटी अनेक कंपन्यांच्या जाहिराती करतात. मात्र, त्यांनी केलेले दावे फोल ठरल्यानंतर कंपन्यांना टीकेचे धनी व्हावे लागते.