ETV Bharat / business

चीन नव्हे 'हा' देश आहे अमेरिकेचा पहिल्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार - चीन

व्यापारी युद्ध असल्याच्या पार्श्वभूमीवर चीनमधून अमेरिकेत निर्यात करण्याचे प्रमाण हे १२ टक्क्यांनी घटले आहे. तर अमेरिकेमधून चीनमध्ये निर्यात करण्याचे प्रमाण १९ टक्क्यांनी घटले आहे.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Aug 3, 2019, 3:17 PM IST

Updated : Aug 3, 2019, 6:50 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या व्यापारी युद्धाचा चीनला पुन्हा एकदा फटका बसत आहे. अमेरिकेबरोबरील व्यापारात पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनने आपले स्थान गमविले आहे. अमेरिके शेजारील मेक्सिको आणि आणि कॅनडा हे देश अमेरिकेबरोबरील व्यापारात पहिल्या क्रमांकावर आले आहेत.

चालू वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात मेक्सिको हा चीनचा व्यापारामधील सर्वात मोठा भागीदार होता, असे अमेरिकेतील माध्यमांनी म्हटले आहे. व्यापारी युद्ध असल्याच्या पार्श्वभूमीवर चीनमधून अमेरिकेत निर्यात करण्याचे प्रमाण हे १२ टक्क्यांनी घटले आहे. तर अमेरिकेमधून चीनमध्ये निर्यात करण्याचे प्रमाण १९ टक्क्यांनी घटले आहे. सत्तेत आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या २५० दशलक्ष किमतीच्या उत्पादनावर २५ टक्के आयात कर लादला. त्यानंतर १ स्पटेंबरला ३०० दशलक्ष किमतीच्या चीनी उत्पादनांवर १० टक्के आयात शुल्क लागू करण्यात आले.

अमेरिकेबरोबर योग्य पद्धतीने चीन व्यापार करत नसल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. चीननेही प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या उत्पादनांवरील आयात शुल्क वाडविण्याचा निर्णय घेतला होता. द्विपक्षीय वस्तू देवाण-घेवाणीमध्ये १४ टक्क्यांची घसरण झाल्याचे वाणिज्य विभागाने अहवालात म्हटले आहे. हे मूल्य २७१.०४ दशलक्ष डॉलर आहे.
अमेरिकेबरोबर चीन व्यापार भागीदारीत २०१५ ते २०१८ दरम्यान तिसऱ्या क्रमांकावर होता.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 3, 2019, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.