ETV Bharat / business

कोरोनाच्या संकटकाळात दिलासा! मासिक हप्ता भरण्याकरिता बँका देणार सवलत

स्टेट बँक ऑफ इंडियासह चार सरकारी बँकांनी ट्विट करत 'मार्च १ ते ३१ मे'दरम्यानच्या मासिक हप्त्यांबाबत माहिती दिली. या तीन महिन्यातील मासिक हप्ते भरण्यासाठी मुदतीची सवलत दिली जाणार आहे. कर्जामध्ये गृहकर्ज , एमएसएमई, वाहन कर्ज इतर सर्व मासिक हप्त्याने घेतल्या कर्जाचा समावेश आहे.

मासिक हप्ता
मासिक हप्ता
author img

By

Published : Mar 31, 2020, 11:21 PM IST

नवी दिल्ली - कर्जाचा मासिक हप्ता भरण्यासाठी ग्राहकांना बँकांकडून दर महिन्याला नोटीस दिली जाते. मात्र, कोरोनाचे संकट असताना चार सरकारी बँकांकडून तीन महिन्यांची मुदत दिली जाणार आहे. ही मुदत भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार दिली जाणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियासह चार सरकारी बँकांनी ट्विट करत 'मार्च १ ते ३१ मे'दरम्यानच्या मासिक हप्त्यांबाबत माहिती दिली. या तीन महिन्यांतील मासिक हप्ते भरण्यासाठी मुदतीची सवलत दिली जाणार आहे. कर्जामध्ये गृहकर्ज , एमएसएमई, वाहन कर्ज इतर सर्व मासिक हप्त्याने घेतल्या कर्जाचा समावेश आहे.

हेही वाचा-एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान केंद्र सरकार घेणार ४.८८ लाख कोटींचे कर्ज

तीन महिने नियम शिथील केल्याने मासिक हप्ता बँक खात्यामधून नेहमीप्रमाणे वजा होणार नाही. तर हे हप्ते न भरल्याने बँक ग्राहकांचा सिबील गुणांकही कमी होणार नाही. मात्र, ग्राहकांना तीन महिन्यांनंतर कर्ज हप्ते भरावे लागणार आहे. त्यासाठी बँकांच्या नियमांप्रमाणे व्याज भरावे लागणार आहे. तर उशिरा भरण्यात येणाऱ्या कर्जाच्या रकमेवर दंड आकारला जाणार नाही.

हेही वाचा-स्टेट बँकेचे कर्मचारी पंतप्रधान निधीकरता १०० कोटींची करणार मदत

ज्या ग्राहकांना नियमितपणे हप्ता भरायचा आहे, त्यांना मासिक हप्ता देता येणार आहे. याबाबतची माहिती ग्राहकांना बँकेला द्यावी लागणार आहे. मासिक हप्त्याबाबतची माहिती अनेक बँकांनी त्यांच्या वेबसाईटवर दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.