सॅनफ्रान्सिस्को – कोरोना महामारीतही अॅपल कंपनीने तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी केली आहे. या दमदार कामगिरीनंतर अॅपलने जगात सर्वाधिक मूल्य असलेल्या अॅराम्को कंपनीला मागे टाकले आहे.
अॅपलने तिमाहीत चांगली कामगिरी केल्याने अॅपलचे शेअर हे 10.47 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यानंतर अॅपल ही जगातील सर्वाधिक मूल्य असलेली कंपनी ठरली आहे. यापूर्वी सौदी अरेबियाची अॅराम्को ही सर्वात मूल्य असलेली कंपनी होती. सौदी अॅम्को कंपनीचे मूल्य हे 1.76 लाख कोटी डॉलर आहे.
विक्रीची दुकाने बंद होवूनही उत्पन्नात वाढ -
कोरोना महामारीत अॅपल कंपनीला जगभरातील अनेक विक्रीची दुकाने बंद करावी लागली आहेत. चालू वर्षात अॅपल कंपनीचे शेअर हे 44 टक्क्यांनी वधारले आहेत. अॅपल कंपनीने चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाही ते तिसऱ्या तिमाहीत जून 27 पर्यंत 59.7 अब्ज डॉलरचा महसूल मिळाला आहे. हा महसूल मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीहून 11 टक्क्यांनी अधिक आहे.
कंपनी नवसंशोधन सुरूच ठेवणार-
अॅपल कंपनीने जूनच्या तिमाहीत सेवा आणि विक्रीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विक्रम केला आहे. त्यासाठी कंपनीने प्रत्येक भौगोलिक प्रदेशात विकासदर अनुभवल्याचे कंपनीचे सीईओ टिम कूक यांनी सांगितले. अनिश्चिततेच्या काळात आमच्या उत्पादनांची परीक्षा ठरली आहे. कंपनी नवसंशोधन सुरुच ठेवणार असल्याचे कुक यांनी सांगितले.
असे मिळविले कंपनीने उत्पन्न-
अॅपल कंपनीने विक्रीतून 26.4 अब्ज डॉलर मिळविले आहेत, तर आयपॅड विक्रीमधून 6.6 अब्ज डॉलर मिळविले आहेत. मॅक या संगणकांच्या विक्रीतून कंपनीने 7.1 अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळविले आहे.