ETV Bharat / business

विषमतेचे चित्र : अमेरिकेत लाखो बेरोजगार; अब्जाधीशांच्या संपत्तीत ४३४ अब्ज डॉलरची वाढ

अमेरिकेत सर्वात श्रीमंत असलेले पाच अब्जाधीश जेफ बेझोस, मार्क झुकेरबर्ग, वॉरेन बफेट आणि ऑरेकलचे लॅरी एलिसन यांच्या संपत्ती ७५.५ अब्ज डॉलरने म्हणजे एकूण १९ टक्क्यांनी वाढली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : May 23, 2020, 8:52 PM IST

न्यूयॉर्क - कोरोनाच्या महामारीमुळे अमेरिकेतील लाखो नागरिकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर याचवेळी अब्जाधीशांच्या संपत्तीत एकूण ४३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या अॅमझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांच्या संपत्तीत ३४.६ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांची संपत्ती २५ अब्ज डॉलरने वाढली आहे.

अमेरिकेत सर्वात श्रीमंत असलेले पाच अब्जाधीश जेफ बेझोस, मार्क झुकेरबर्ग, वॉरेन बफेट आणि ऑरेकलचे लॅरी एलिसन यांच्या संपत्ती ७५.५ अब्ज डॉलरने म्हणजे एकूण १९ टक्क्यांनी वाढली आहे. अमेरिकन फॉर टॅक्स फेअरनेस (एटीएफ) आणि इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजच्या (आयपीएस) माहितीनुसार अमेरिकेचे अब्जाधीश आर्थिक बाबतीत खूप प्रगती करत आहेत. प्रत्यक्षात कोरोना महामारीमुळे अमेरिका दोन महिने बंद होती.

असमानतेबाबत बोलताना आयपीएस कार्यक्रमाचे संचालक चक बिलियन्स म्हणाले, की जगभरात महामारी असताना अब्जाधीश हे संपत्तीत त्याग करत नसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा-कोरोनाशी लढा: रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांकरता 'टाटा'कडून मदत

फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार १८ मार्च ते १९ मे दरम्यान ६०० हून अधिक अमेरिकन अब्जाधीशांची एकूण संपत्ती ४३४ अब्ज डॉलरने अथवा १५ टक्क्यांनी वाढली आहे. तर सुमारे ३.८० कोटी अमेरिकन नागरिकांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत.

दरम्यान अमेरिकेत सुमारे १५ लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सुमारे ९० हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-'या' कंपनीत ३१९ कोटींच्या गुंतवणुकीनंतरही २००हून अधिक कर्मचाऱ्यांवर संक्रात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.