नवी दिल्ली - अॅमेझॉन इंडियाने अन्नपदार्थ घरपोच देण्याची सेवा आज बंगळुरूमध्ये लाँच केली आहे. टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या झोमॅटो आणि स्विग्गीबरोबर अॅमेझॉन कट्टर स्पर्धा करणार आहे.
कोरोना आणि टाळेबंदीमुळे ग्राहकांनी ऑनलाईन अन्नपदार्थ मागविणे जवळपास बंद केले आहे. उत्पन्न बुडत असल्याने झोमेटो आणि स्विग्गीने १ हजार ६००हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. अशा परिस्थितीत अॅमेझॉनने ऑनलाईन अन्नपदार्थ घरपोच क्षेत्रात प्रवेश केला आहे.
हेही वाचा-इंडियाबुल्सकडून २ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीला कात्री; सोशल मीडियात संताप
अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले, की जीवनावश्यक वस्तुंची खरेदी केल्यानंतर अनेक ग्राहकांकडून तयार अन्नपदार्थांची मागणी करण्यात आली आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत अनेकांना घरी सुरक्षित राहण्याची इच्छा आहे. भारतीय बाजारपेठेत व्यवसायाचा कसा विस्तार करता येणार आहे, हे प्रवक्त्याने सांगितले नाही. सध्या, केवळ बंगळुरूमध्ये ठराविक पिन कोडवरच सेवा सुरू असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.
हेही वाचा-फोर्स मोटर्सचे आकुर्डी, चाकणसह चेन्नईतील उत्पादन प्रकल्प सुरू होणार