न्यूयॉर्क - अॅमेझॉनचा संस्थापक जेफकडून पत्नी मॅककेन्झी बेझोसला देण्यात येणार घटस्फोट जगभरात चर्चेचा विषय झाला. या घटस्फोटानंतर मॅककेन्झी यांना पतीकडून मोठी रक्कम मिळणार आहे. यातील निम्मी रक्कम म्हणजे १ लाख २६ हजार कोटींचे दान करणार असल्याचा निर्णय मॅककेन्झी यांनी जाहीर केला आहे. त्यासाठी त्यांनी प्रतिज्ञा घेतल्याचेही जाहीर केले आहे.
सामाजिक कार्याला दान केल्यानंतर मॅककेन्झी यांचा जगातील सर्वात दानशूर व्यक्तींच्या यादीत समावेश होणार आहे. वॉरेन बफेट यांनी २०१० मध्ये सेवाभावी संस्थेची स्थापना केली. या संस्थेला चीन, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिराती आणि इंग्लंडच्या देशातील अब्जाधीशांह बिल गेट्स यांनी दान दिले आहे. या संस्थेला दान करण्याच्या प्रतिज्ञेत सहभागी होणार असल्याचे मॅककेन्झी यांनी जाहीर केले.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जेफने घटस्फोट दिल्यानंतर मॅककेन्झी यांची संपत्ती ही ३६00 कोटी डॉलर एवढी होणार आहे. फोर्ब्सने अब्जाधीशांच्या यादीत अद्याप त्यांचा समावेश केला नाही. घटस्फोटानंतर त्या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला ठरणार आहेत. आयुष्यात जी काही मालमत्ता मिळाली, त्याने आयुष्याचे पोषण केल्याचे मॅककेन्झी यांनी म्हटले आहे. माझ्याकडे वाटण्यासाठी भरपूर संपत्ती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
बफेट यांच्या संस्थेला दान देण्यासाठी जगातील २०० हून अधिक अब्जाधीशांनी प्रतिज्ञा घेवून दान दिले आहे. यामध्ये फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गचाही समावेश आहे.