ETV Bharat / business

चालू आर्थिक वर्षात देशाच्या विकासदरात ९ टक्क्यांच्या घसरणीचा एडीबीचा अंदाज - India GDP 2021 prediction

टाळेबंदीचा चालू आर्थिक वर्षाच्या विकासदरात मोठा फटका बसणार असल्याचा एडीबीने अंदाज व्यक्त केला आहे. असे असले तरी पुढील आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था सावरेल, असा सकारात्मक अंदाज एडीबीने व्यक्त केला आहे.

एडीबी
एडीबी
author img

By

Published : Sep 15, 2020, 3:34 PM IST

Updated : Sep 16, 2020, 1:31 PM IST

नवी दिल्ली - भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर चालू वर्षात ९ टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) वर्तविला आहे. कोरोना महामारीचा आर्थिक चलनवलनावर आणि देशातील ग्राहकांच्या भावनांवर परिणाम होणार आहे. त्याचाच अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचे एडीबीने म्हटले आहे.

एशियन डेव्हलपमेंट बँकेने पुढील आर्थिक वर्षाबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. एडीबीने आउटलूक (एडीओ) २०२० अपडेट या अहवालात म्हटले की, वर्ष २०२१-२१ मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर मोठ्या प्रमाणात सावरण्याची शक्यता आहे. मोबिलिटी आणि वाहतूक चलनवलन पूर्ववत सुरू झाल्यानंतर पुढील आर्थिक वर्षात देशाचा सकल उत्पादन (जीडीपी) हा ८ टक्के होईल, असा अंदाज आहे.

कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी भारताने कडक टाळेबंदी लागू केली होती. त्याचा देशाच्या आर्थिक चलनवलनावर मोठा परिणाम झाल्याचे एडीबीचे मुख्य अर्थतज्ज्ञ यासुयूकी सावडा यांनी सांगितले आहे.

संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बळकटपणाने चाचणी, ट्रॅकिंग आणि क्षमतेने खात्रीशीर उपचार यांची सातत्याने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याचा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी फायदा होऊ शकतो. तसेच अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पुढील आर्थिक वर्षात व नंतर शाश्वत माध्यम उपलब्ध होऊ शकते, असे एडीबीने अहवालात म्हटले आहे.

Last Updated : Sep 16, 2020, 1:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.