ETV Bharat / briefs

सांगलीत कोरोनामुळे आणखी दोघांचा बळी; एका दिवसात तब्बल १९ नवे रुग्ण

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी एकाच दिवसात दुपारपर्यंत कोरोना रुग्ण संख्येत तब्बल 19 रूग्णांची भर पडली आहे. तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच पाच जण कोरोना मुक्त झाले आहेत.

sangli news
two corona patients were dead at sangli due to covid -19
author img

By

Published : Jun 7, 2020, 7:04 PM IST

सांगली - जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून कोरोनामुळे आणखी दोघांचा बळी गेला आहे. तर रविवारी दुपारपर्यंत तब्बल 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये शिराळा तालुक्यातील माणदूर गावातील 13 जणांचा समावेश आहे. तर 5 जणांनी कोरोनानर मात केली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आत्ता अॅकेटीव्ह रूग्णांची संख्या 68 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १६७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी एकाच दिवसात दुपारपर्यंत कोरोना रुग्ण संख्येत तब्बल 19 रूग्णांची भर पडली आहे. तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच पाच जण कोरोना मुक्त झाले आहेत. मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन जणांचा रविवारी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये जत तालुक्यातल्या औंढा येथील 55 वर्षीय व्यक्ती आणि शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 80 वर्षाच्या वृद्धाचा समावेश आहे.

नवे 19 कोरोना रुग्ण -

रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकाच दिवसात सांगली जिल्ह्यात तब्बल 19 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. शिराळा तालुक्यातील माणदूर येथील एकाच गावातील 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या मध्ये 8 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. तर सोनवडे येथील 28 वर्षीय युवकालाही कोरोनाची लागण झाली आहे. तासगाव तालुक्यातल्या पेड येथील 35 वर्षीय तरुण आणि वायफळे येथील 52 वर्षीय व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील 38 वर्षीय महिला, खानापूर तालुक्यातील विटयाच्या हनुमाननगर मधील 24 वर्षीय तरुण, इस्लामपूर शहरातल्या कोरेनगर येथील 33 वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश आहे. तसेच रविवारी दिवसभरात पाच जण कोरोना मुक्त झालेले आहेत.यामध्ये वाळवा तालुक्यातल्या चांदोली वसाहतीमधील २२ वर्षीय युवक, खानापूर तालुक्यात करंजी येथील ३० वर्षीय तरुण, कडेगाव तालुक्यातल्या आंबेगाव येथील १२ वर्षीय मुलगी आणि ९ वर्षीय मुलगा आणि शिराळा तालुक्यातल्या मणदूर येथील २१ वर्षीय युवकांचा समावेश आहे.

तर रविवारी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 19 नवे रुग्ण आणि 5 जण कोरोनामुक्त झाल्याने सांगली जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ही 68 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 167 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यामधील 92 जण हे कोरोनातून बरे झाले असेलयाची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.