ETV Bharat / briefs

इंधन दरवाढी विरोधात ठाणे काँग्रेसचे धरणे आंदोलन; इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी - Petrol diesel rate hike protest thane

नागरीक आधीच एका संकटाचा सामना करत असताना दरवाढीचे हे दुसरे संकट कशासाठी, असा सवाल सचिन शिंदे यांनी उपस्थित केला, या संदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दरवाढ रद्द करावी, अशी मागणी केली.

Thane congress protest
Thane congress protest
author img

By

Published : Jun 29, 2020, 5:10 PM IST

ठाणे- संपूर्ण देशात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे जनता हैराण झाली असताना आता मागील काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगणाला भिडू लागले आहेत. त्यामुळे वाढत्या अन्यायकारक दरांबाबत शहर काँग्रेसच्या वतीने सोमवारी केंद्र सरकाराच्या निषेधार्त धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी हे आंदोलन करून ही दरवाढ रद्द करावी, अशा आशयाचे निवेदन काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

केंद्र सरकाराने पेट्रोल डीझेलची दरवाढ रद्द करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार व ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष अँड. विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकाराने घेतलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय परिसर, स्टेशन रोड ठाणे येथे आंदोलन घेण्यात आले. या प्रसंगी काँग्रेस नेते रविंद्र आंग्रे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे, काँग्रेसचे माजी गटनेते संजय घाडीगावकर, सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील, आशिष दूबे, सन्नी थाॅमस आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सध्यस्थितीत सुरू असलेल्या कोरोना संसर्गच्या पाश्र्वभूमीवर अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. अनेकांचे पगार कमी झालेले आहेत. घर चालविणे अनेकांना कठीण झाले आहे. बेरोजगारी वाढली आहे, व्यापारी वर्गाला आपला व्यवसाय कसा चालवायचा असा प्रश्न पडलेला आहे. परंतु, मागील महिनाभरात जवळ जवळ 9.50 रुपयांची वाढ पेट्रोल आणि डिझेलमध्ये केलेली आहे. या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तुंचेही दरवाढ होणार आहेत. त्यामुळे ही दरवाढ अन्यायकारक असून ती तत्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

नागरिक आधीच एका संकटाचा सामना करत असताना दरवाढीचे हे दुसरे संकट कशासाठी, असा सवाल सचिन शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला. या संदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ही दरवाढ रद्द करावी, अशी मागणी देखील केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.