चेन्नई - सुरेश रैना आयपीएलच्या इतिहासात आणखी एका ऐतिहासिक विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या सुरेन रैना सध्या धोनीच्या गैरहजरीत संघाचे नेतृत्व करत आहे. पण त्याला नेतृत्वात फारसे यश मिळाले नाही. पण त्याला पुढच्या सामन्यात एक अनोखा विक्रम करण्याची संधी आहे.
सुरेश रैना याने १८७ सामन्यात ९९ झेल घेतले आहेत. शुक्रवारी झालेल्या मुंबई विरुद्धच्या सामन्यात एक झेल घेतला असता तर त्याचे झेल घेण्याचे शतक पूर्ण झाले असते. त्याला झेलचे शतक पूर्ण करण्यासाठी आणखीन एक झेल घेण्याची गरज आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या यादीत एबी डिविलियर्स दुसऱ्या स्थानी आहे. त्याने १५१ सामन्यात ८४ झेल घेतले आहेत. त्यानंतर रोहित शर्माने ८२, किरोन पोलार्ड ७९ आणि विराट कोहलीने ७१ झेल घेतले आहेत.
सुरेश रैना हा उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक मानला जातो. दर्जेदार क्षेत्ररक्षणाने त्याने अनेकादा क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने ५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत, अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.