ETV Bharat / briefs

मान्सूनसाठी सर्व यंत्रणांसह मुंबई महापालिका सज्ज - आयुक्त

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पावसाळयापूर्वी सर्व यंत्रणाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर माहिती देताना महापालिकेचा मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष वर्षाचे 365 दिवस आणि 24 तास कार्यरत असतो. यात महापालिकेची 24 प्रशासकीय विभाग कार्यालये, 6 मोठी रुग्णालये आणि 22 बाहय यंत्रणांना जोडणा-या 52 हॉट लाईन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत.

author img

By

Published : Jun 12, 2020, 8:26 PM IST

mumbai mansoon news
mumbai mansoon news

मुंबई - दरवर्षी मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबणे, इमारती कोसळणे, घरे पडणे, शॉर्टसर्किट सारख्या दुर्घटना घडतात. अशा दुर्घटना घडल्यास त्वरित मदत कार्य करता यावे, तसेच पावसाळ्या दरम्यानचे नियोजन करता यावे म्हणून मुंबईत येवू घातलेल्या मान्सूनसाठी महापालिकेसह सर्व यंत्रणा सज्ज आणि सतर्क असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पावसाळयापूर्वी सर्व यंत्रणाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर माहिती देताना महापालिकेचा मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष वर्षाचे 365 दिवस आणि 24 तास कार्यरत असतो. यात महापालिकेची 24 प्रशासकीय विभाग कार्यालये, 6 मोठी रुग्णालये आणि 22 बाहय यंत्रणांना जोडणा-या 52 हॉट लाईन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत.

मुंबईत आणिबाणी सदृष्य प्रसंगी पालिका आयुक्तांसह अति महत्वाच्या 53 ठिकाणांसह संबंधित वरिष्ठ अधिका-यांच्या वाहनांमध्ये बिनतारी संदेश (व्हिएचएफ) यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. नागरिकांना तक्रार करता यावी म्हणून 1916 या हेल्पलाईन क्रमांकाच्या 30 हंटींग लाईन्स कार्यान्वयीत करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलि‍सांमार्फत बृहन्मुंबईत बसविण्यात आलेल्या 5258 सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे नियमित निरि‍क्षण आणि याद्वारे संबंध मुंबई शहरावर नियंत्रण ठेवण्यात येते. नियंत्रण कक्षातील संदेशवहन यंत्रणा कोलमडल्यास त्वरि‍त संदेशवहनाकरिता हॅम रेडीओ तयार ठेवण्यात आला आहे. मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात काही समस्या उद्भवल्यास परळ येथे पर्यायी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.

सर्व २४ प्रशासकिय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळासह सुसज्ज करण्यात आले आहेत. प्रत्येक नियंत्रण कक्षांमध्ये थेट दूरध्वनी सेवा देण्यात आली आहे. या सोबतच बिनतारी यंत्रणा आणि 4 हॉट लाईन्स देखील प्रत्येक विभागीय नियंत्रण कक्षात कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मान्सून कालावधीमध्ये मोठया प्रमाणावर झाडे किंवा झाडांच्या फांद्या पडण्याच्या तक्रारी येत असतात. याबाबत त्वरीत कार्यवाहीकरिता विभाग कार्यालयात कनिष्ठ वृक्ष अवेक्षक यांची तीन्ही सत्रांमध्ये अनु क्रमानुसार नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर पडलेली झाडे कापणे आणि उचलणे या करिता कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था कोलमडल्यास विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांकरिता, तसेच आपत्तीमुळे बेघर झालेल्या नागरिकांकरिता महापालिकेच्या 134 शाळा आणिबाणीत एकत्रित जमण्याची ठिकाणे म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत शहर आणि उपनगरात 299 ठिकाणी पाण्याचा उपसा करणारे उदंचन संच बसविण्यात आले आहेत. सर्व 24 विभागांकरिता एकूण 2300 रिफ्लेक्टीव्ह जॅकेट्स वितरीत करण्यात आले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात पूर सदृश परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्याकरिता एकूण 20 जीवरक्षक तराफे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. विभागांची भौगोलिक परिस्थिती आणि पूर परिस्थितीची संभाव्यता लक्षात घेऊन डी, एफ उत्तर, जी दक्षिण, के पूर्व, के पश्चिम, एल, एम पश्चिम, पी उत्तर, पी दक्षिण, आर दक्षिण, एस व टी या विभागांना प्राधान्याने हे जीवरक्षक तराफे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या dm.mcgm.gov.in या वेबसाईट व “Disaster Management MCGM” या मोबाईल अ‌ॅपवर पडलेला पाऊस, समुद्राला असलेली भरती या संबंधिचे इशारे दिले जाणार आहेत. वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिल्यावर मोबाईल कंपन्यांना नागरिकांना तसे संदेश पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समुद्रावरील सुरक्षितता -

समुद्रास ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येणा-या मोठ्या भरतीच्या दिवशी तसेच शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशी नागरिक समुद्रात बुडण्यासारख्या दुर्देवी घटना घडू नयेत, याकरिता 6 समुद्रकिना-यांवर जीवरक्षकांसह अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान, पोलीस पेट्रोलिंग वाहने तैनात असणार आहेत. नागरिकांनी समुद्रात प्रवेश करुन अपघात घडू नयेत, याकरिता समुद्रावर धोक्याच्या सूचना देणारे सूचना फलक लावण्यात आले आहेत.

यंत्रणांची सुसज्जता -

● मुंबई अग्निशमन दल -

पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी पूर प्रतिसाद पथकामध्ये 160 अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. या कर्मचा-यांना वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला कमानी, चेंबूर, मरोळ आणि बोरीवली या अग्निशमन केंद्रांवर तैनात करण्यात आले आहे. संभाव्य पूर परिस्थिती दरम्यान आवश्यक असणारी जीवसंरक्षक सामुग्री वांद्रे, वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला कमानी, चेंबूर मरोळ व बोरीवली येथील अग्निशमन केंद्रांवर तैनात ठेवण्यात आली आहे.

● थलसेना (Indian Army) -

थलसेनेच्या 6 तुकड्या आणिबाणी परिस्थिती उद्भवल्यास त्वरीत मदतीकरिता तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. या प्रत्येक तुकडीमध्ये जवान आणि अधिकारी मिळून 45 सैनिक आहेत. याप्रमाणे एकूण 270 जवान कार्यतत्पर आहेत. या तुकड्यांमधील बहुतेक सर्वच सैनिक जलतरणपटू असून त्यांच्याकडे 6 बोटी, 3 ओबीएम आणि 80 लाईफ जॅकेट्स उपलब्ध आहेत.

● नौदल (Indian Navy) -

कुलाबा, वरळी, मालाड, मानखुर्द आणि घाटकोपर येथे नौदलाची 5 पूर बचाव पथके तैनात आहेत. नौदलाचे 1 पाणबुडी पथक कुलाबा येथे तर 2 पथके उरण येथे तैनात आहेत. कुलाबा येथे चेतक आणी सी - किंग नावाचे हेलिकॉप्टर मदतीकरिता तत्पर आहे. आणिबाणी प्रसंगी शोध आणि बचाव कार्यासाठी एक स्वतंत्र जहाज तैनात आहे. कुलाबास्थित आयएनएस आंग्रे येथील नौदलाच्या सागरी सुरक्षा मुख्यालयात आपत्ती नियंत्रण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

● भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) -

भारतीय तटरक्षक दलाची 4 पथके मान्सून कालावधी दरम्यान सज्ज ठेवण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकात 4 सदस्य आहेत. ही पथके कुलाबा, वरळी आणि मानखुर्द येथे तैनात आहेत. या पथकांकडे तरंगणारे तराफे, लाईफ जॅकेट्स, दोरांसह लाईफ बॉईज, प्रथमोपचार संच उपलब्ध असतील. तटरक्षक दलाचा निशुल्क हेल्पलाईन क्रमांक 1954 आहे. भारतील तट रक्षक दलाचा वरळी येथील नियंत्रण कक्ष महापालिकेच्या मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी हॉटलाईनद्वारे जोडण्यात आलेला आहे.

● राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (National Disaster Response Force) - मुंबईत कोणत्याही प्रकारची आणिबाणी परिस्थिती उद्भवल्यास त्वरीत मदतकार्याकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या 3 तुकडया अंधेरी क्रीडा संकुल येथे तैनात आहेत.अधिकारी आणि जवान मिळून एका तुकडीचे संख्याबल 45 इतके आहे. या पथकाकडे अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. या पथकातील जवान आणि अधिकारी विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये शोध व बचावकार्य करण्याकरिता प्रशिक्षित आहेत.

विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक -
विभाग दूरध्‍वनी क्रमांक
१ ए - २२६२४०००
२ बी - २३७९४०००
३ सी - २२०१४०००
४ डी - २३८६४०००
५ ई - २३०१४०००
६ एफ/दक्षिण - २४१०३०००
७ एफ/उत्तर - २४०८४०००
८ जी/दक्षिण - २४२२४०००
९ जी/उत्तर - २४३९७८८८ / २४२१२७७८
१० एच/पूर्व - २६११४०००
११ एच/पश्चिम - २६४४४०००
१२ के/पूर्व - २६८४७०००
१३ के/पश्चिम - २६२३४०००
१४ एल - २६५०५१०९
१५ एम/पूर्व - २५५५८७८९
१६ एम/पश्चिम - २५२८४०००
१७ एन - २५०१३०००
१८ पी/दक्षिण - २८७२७०००
१९ पी/उत्तर - २८८२६०००
२० आर/दक्षिण - २८०५४७८८
२१ आर/उत्तर - २८९३६०००
२२ आर/मध्य - २८९३११८८
२३ एस - २५९५४०००
२४ टी - २५६९४०००

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.