ETV Bharat / briefs

राज्यात लॉकडाऊन काळात 484 सायबर गुन्ह्यांची नोंद, 260 जणांना अटक - cyber crime cases in maharashtra

लॉकडाऊन काळात राज्यभरात वेगवेगळ्या सामाजिक माध्यमाद्वारे विवादास्पद पोस्ट शेअर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 484 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर, अशा प्रकरणात 260 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

राज्यात लॉक डाऊन काळात 484 सायबर गुन्ह्यांची नोंद 260 जणांना अटक

author img

By

Published : Jun 19, 2020, 3:15 PM IST

मुंबई - राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून सोशल माध्यमांवर काही असामाजिक तत्त्व परिस्थितीचा गैरफायदा घेत समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा व अफवा पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे, अशा समाज कंटकांच्या विरोधात राज्याच्या सायबर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात 484 गुन्ह्यांची नोंद झाली असून याप्रकरणी 260 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

लॉकडाऊन काळात राज्यभरात विवादास्पद व्हॉट्सअ‌ॅप पोस्ट फॉरवर्ड केल्याप्रकरणी 195 गुन्हे, फेसबुक पोस्ट प्रकरणी 199 गुन्हे दाखल झाले असून टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 26 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे चुकीचे मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून इंस्टाग्रामवर चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर, ऑडिओ क्लिप युट्युब सारख्या माध्यमांचा गैरवापर केल्याप्रकरणी 51 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हावार दाखल सायबर गुन्ह्यांची नोंद -

राज्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 50 सायबर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यानंतर पुणे ग्रामीण विभागात 41, जळगाव 34, मुंबई 28, नाशिक ग्रामीण 18, कोल्हापूर 17, सांगली 15, बुलढाणा 15, ठाणे शहर 15, सातारा 14, जालना 13, नांदेड 13, नवी मुंबई 13, नाशिक शहर 13, अहमदनगर 12, ठाणे ग्रामिण 11, पालघर 11, लातूर 10, नागपूर शहर 10, परभणी 9, सिंधुदुर्ग 8, हिंगोली 8, अमरावती 7, चंद्रपूर 6, गोंदिया 6, सोलापूर ग्रामीण 5, पुणे शहर 5, रत्नागिरी 5, सोलापूर शहर 4, नागपूर ग्रामीण 4, भंडारा 4, पिंपरी-चिंचवड 4, अमरावती ग्रामीण 4, धुळे 4, वर्धा 3, रायगड 2, वाशीम 2, नंदुरबार 2, उस्मानाबाद 2, औरंगाबाद 2, यवतमाळ 1, अकोला 1, औरंगाबाद ग्रामीण 1 एवढे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.