ETV Bharat / briefs

RCB vs KKR: बंगळुरूचे कोलकातापुढे २०६ धावांचे आव्हान, विराट अन् एबीचे अर्धशतक

आजच्या सामन्यात बंगळुरूच्या संघाला विजय आवश्यक आहे.

author img

By

Published : Apr 5, 2019, 7:37 PM IST

Updated : Apr 5, 2019, 9:43 PM IST

केकेआरने नाणेफेक जिकंत घेतला गोलंदाजीचा निर्णय

बंगळुरू - चिन्नस्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या आयपीएलच्या १७ व्या सामन्यात बंगळुरूने कोलकातापुढे विजयासाठी २०६ धावांचे आव्हान ठेवले आहे. विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांनी अर्धशतकीय खेळी केल्यामुळे आरसीबीने २० षटकात ३ बाद २०५ धावा रचल्या आहे.

कोलकाताच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराटने फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीचा फायदा उचलत चांगली कामगिरी केली. त्याने ४९ चेंडूत ८४ धावांची खेळी केली. त्यात ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.

एबी डिविलियर्सने त्याला सुरेख साथ देत ६३ धावांची खेळी केली. त्याने ३२ चेंडूत ६३ धावांची स्फोटक खेळी केल्याने आरसीबीच्या संघाला दोनशे पर्यंत मजल मारता आली. मार्कस २८ तर पार्थिव पटेलने २५ धावांचे योगदान दिले. कोलकाताकडून कुलदीप यादव, सुनील नरेन आणि नीतिश राणा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 5, 2019, 9:43 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

SPO 4
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.