ETV Bharat / briefs

कंगनाच्या 'मेंटल...'ची ह्रतिकच्या 'सुपर ३०' शी थेट टक्कर

कंगना रानावतच्या आगामी 'मेंटल है क्या' आणि 'ह्रतिक रोशन'च्या 'सुपर ३०' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील टक्कर अटळ झाली आहे. कंगना आणि ह्रतिकमध्ये असलेल्या वैराचाच हा भाग असल्याची चर्चा रंगत आहे. मात्र व्यावसायिक अपरिहार्यतेमुळे हा निर्णय घेतल्याचे एकता कपूरने म्हटलंय.

author img

By

Published : May 7, 2019, 11:21 PM IST

'मेंटल'ची 'सुपर ३०' शी थेट टक्कर

मुंबई - कंगना रानावत आणि ह्रतिक रोशन यांच्यातील वैर आता विकोपाला पोहोचलंय. तिचा आगामी 'मेंटल है क्या' हा चित्रपट २१ जुलैला रिलीज होणार होता. दरम्यान ह्रतिक रोशनच्या 'सुपर ३०' या चित्रपटाची रिलीज २६ जुलैला ठरली होती. मग आमच्या कंगनाबाई खवळल्या आणि त्यांनी आपला सिनेमा २१ ऐवजी २६ जुलै रोजी रिलीज करण्याचा आग्रह धरला. तिच्या हट्टापायी निर्मात्याने आता ह्रतिकच्या चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर टक्कर घ्यायचे ठरवले आहे, अशी चर्चा सिनेजगतात सुरू आहे.

मात्र निर्मात्यांनी या अफवा असल्याचे म्हटले आहे. एकता कपूर यांनी ट्विटरवर याचा खुलसा करण्याचा प्रयत्न केलाय. वितरकांनीच ही तारीख ठरवल्याचे तिने म्हटलंय. व्यावसायिक विचार करुनच हा निर्णय झाल्याचे तिचे म्हणणे आहे.

'मेंटल है क्या' हा बालाजी मोशन पिक्चर्सचा सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. एकता कपूरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कोवेलमुडी यांनी केलंय.

या चित्रपटात कंगनासोबत राजकुमार राव, अमेरा दस्तुर, ह्रर्शिता भट्ट, विक्रांत मेसी आणि जिमी शेरेगिल यांच्या भूमिका आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.