नवी दिल्ली - इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम हा गाडी चालविताना फोनवर बोलत होता. त्यामुळे लंडन येथील न्यायालयाने त्याच्यावर सहा महिने गाडी चालविण्यास बंदी घातली आहे.
बॅकहम मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये लंडन येथे गाडीवर बोलत असताना सापडला होता. बॅकहमने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. दक्षिण पश्विम लंडनच्या ब्रोम्ले मजिस्ट्रेट न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
याप्रकरणी बॅकहमला ७५० पाऊडचा दंड आकारण्यात आला आहे. याचबरोबर त्याला सात दिवसांच्या आत १०० पाऊड आणि ७५ पाउंड सरचार्जदेखील द्यावा लागणार आहे.