नागपूर - महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकालात नागपुरातील चैतन्य अय्यरने गुणांचा शिखर गाठत ९९.०२ टक्के गुण मिळवत यशाचा झेंडा रोवला आहे. विशेष म्हणजे विज्ञान शाखेतून चैतन्यने इतके गुण मिळवल्याबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षात होत आहे.
बारावीच्या निकालावरुन विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही चांगलीच धाकधूक लागली होती. मात्र, निकाल लागताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. कुठे हसू तर कुठे रूसुदेखील दिसून आले. मात्र, नागपुरातील चैतन्यने ९९.०२% गुण मिळवत यशाचा नवा डोंगर रचल्याने सर्वत्र चैतन्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चैतन्य हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, नागपूरचा विद्यार्थी आहे. प्रचंड मेहनत व जिद्दीच्या आधाराव त्याने हे यश संपादन केल्याचे तो सांगतो. चैतन्यने विज्ञान शाखेतून हे गुण मिळवल्याने अधिकच कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.
चैतन्यचे वडिल हे प्राध्यापक तर आई गृहिणी आहेत. अभ्यासात असणाऱ्या सातत्यामुळे हे शिखर गाठता आल्याचे चैतन्य म्हणाला. या यशाच्या वाटेत अनेक अडथळे आले परंतु अभ्यासात सातत्य असल्याने आणि भविष्याची ध्येय डोळ्यापुढे असल्यामुळे हे सहजच करता आल्याचे भाव त्याने व्यक्त केले. सोबतच मानसिक ताण असायचा त्यावेळी चैतन्य संगीत ऐकत असे, असेही यावेळी चैतन्य अय्यरने सांगितले. विशेष म्हणजे चैतन्यला भविष्यात अर्थतज्ज्ञ व्हायचे आहे. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने हे यश खूप महत्त्वाचे असल्याचे, यावेळी सांगण्यात आले. असे असले तरी या पुढचा प्रवास अधिकच कठिण असल्याने खूप मेहनत करायची आहे, असे मत यावेळी चैतन्यने यावेळी व्यक्त केले. चैतन्यच्या या यशामुळे महाविद्यालयच नाही तर संपूर्ण निगपूरकरांची मान अभिमानाने उंचावली असल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.