गेवराई (बीड) - कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून आमदार लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली गेवराईतील महात्मा फुले शाॅपिग सेंटर येथे २ मे रोजी सकाळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आहे. तसेच कोरोनाचा सामना करत असताना सर्वसामान्य माणसाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आहे. ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही तर कोरोनासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि रक्ताचाही तुटवडा निर्माण झाला आहे.
अशा परिस्थितीत रक्तदान शिबीर आयोजित करून प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान करणे आवश्यक आहे. म्हणून गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभाग नोंदवला.
यावेळी तहसीलदार सचिन खाडे, राजेश शिंदे, पि.आय.पेलगुरवार, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, जि.प. सदस्य पांडुरंग थडके, सभापती दिपक सुरवसे, दादासाहेब गिरी, राजेंद्र भंडारी,भगवान घुबार्डे, प. स. सदस्य संजय जाधव, शाम कुड, अरुण चाळक, जानमहमंद बागवान, मधुकर तौर, आदी. उपस्थित होते. यावेळी ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.