ETV Bharat / briefs

अभिनेत्री दिपाली सय्यदचा सुजय विखेंना पाठिंबा, निवडून देण्याचे चाहत्यांना आवाहन

दिपाली म्हणाल्या, की मला अनेक पक्षाकडून पाठिंब्यासाठी आग्रह केला जात होता. पण, आपण युतीचे घटक पक्ष आहोत. तसेच, सुजय विखेंची कामाची धडाडी पाहून मी हा निर्णय घेतला. लोकसभा निवडणूक लढवण्यात मला रस नसल्याचे दिपाली म्हणाल्या.

author img

By

Published : Apr 2, 2019, 1:41 PM IST

दिपाली सय्यद

अहमदनगर - अभिनेत्री आणि शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा दिपाली सय्यद यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विखेंना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आणि नागरिकांना केले. सय्यद यांनी याआधी आम आदमी पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती.

सुजय विखे धडाडीने काम करत असल्याचे दिपाली सय्यद म्हणाल्या

दिपाली म्हणाल्या, की मला अनेक पक्षाकडून पाठिंब्यासाठी आग्रह केला जात होता. पण, आपण युतीचे घटक पक्ष आहोत. तसेच, सुजय विखेंची कामाची धडाडी पाहून मी हा निर्णय घेतला. लोकसभा निवडणूक लढवण्यात मला रस नसल्याचे दिपाली म्हणाल्या. पण, विधानसभा निवडणूक पक्ष सांगेल त्या जागेवरुन लढण्याची आपली तयारी असल्याचे त्या म्हणाल्या.

गेल्या काही महिन्यांपासून दिपाली सय्यद साकळाई पाणी योजना पूर्ण व्हावी यासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला सुजय विखेंनी पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही योजना पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे पाठिंबा देत असल्याचे सय्यद म्हणाल्या.

Intro:अहमदनगर- अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा सुजय विखे यांच्या उमेदवारीला पाठिंबा.. फॅन्सला केले निवडून देण्याचे आवाहन.

Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

अहमदनगर- अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा सुजय विखे यांच्या उमेदवारीला पाठिंबा.. फॅन्सला केले निवडून देण्याचे आवाहन.

अहमदनगर- अभिनेत्री आणि शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा दीपाली सय्यद यांनी नगर दक्षिण मधील युतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. दीपाली सय्यद ह्यांनी यापूर्वी आप कडून नगर मधून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षात प्रवेश केला. गेल्या काही महिन्यांपासून त्या जिल्ह्यातील साकळाई पाणी योजना पूर्ण व्हावी यासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देत सुजय विखे यांनी ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी दीपाली सय्यद यांना साथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही योजना पूर्ण करू असे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते. या पार्श्वभूमीवर दीपाली सय्यद यांनी सुजय विखे यांना पाठिंबा देत आपले फॅन्स आणि आंदोलनात सोबत असलेल्या शेतकऱ्यांना विखे यांना निवडून देण्याचे आवाहन नगर इथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. आपल्याला अनेक पक्षाकडून पाठिंब्यासाठी आग्रह केला जात होता. पण आपण युती सरकार मधील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राम मध्ये असल्याने आणि सुजय विखे यांच्या कामाची धडाडी पाहून त्यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला असल्याचं त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक लढवण्यात आपल्याला रस नसला तरी येत्या विधानसभा निवडणुकीत आपण नगर जिल्ह्यातून पक्ष देईल त्या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे बोलून दाखवले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा सुजय विखे यांच्या उमेदवारीला पाठिंबा.. फॅन्सला केले निवडून देण्याचे आवाहन.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.