ETV Bharat / briefs

मोहन भागवतांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; भद्रावती-वरोरा मार्गा वरील घटना - Mohan Bhagwat con-way

आरएसएसचे संघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाला आहे. वरोरा-भद्रावती मार्गावर हा अपघात घडला आहे.

मोहन भागवत
author img

By

Published : May 16, 2019, 6:56 PM IST

Updated : May 16, 2019, 8:14 PM IST

चंद्रपूर - चंद्रपूर येथून नागपुरकडे जात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला. यात एक सीआयएसएफचा जवान यश पाल जखमी झाला. ही घटना वरोरा तालुक्यातील नंदुरी येथे घडली.

मोहन भागवतांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात

सरसंघचालक मोहन भागवत यांचे चंद्रपूर हे मूळ गाव आहे. आज ते एका कार्यक्रमासाठी चंद्रपूरला आले होते. नागपूरला परत जाताना त्यांच्या ताफ्यातील पहिल्या वाहनाचा अपघात झाला आणि वाहन उलटले. वरोरा मार्गावरील नंदूरी जवळ ही घटना घडली. यात सीआयएसएफचा एक जवान किरकोळ जखमी झाला. ताफ्यातील सर्व सुखरूप असून जखमी जवानाला नागपुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी हे अपघातग्रस्त वाहन उचलून नेले.

चंद्रपुर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. वरोरा-भद्रावती मार्गावरील नांदुरी गावाजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. 

सविस्तर माहिती थोड्याच वेळात
Last Updated : May 16, 2019, 8:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.