ठाणे - कालपासून ठाण्यात रिमझिम पाऊस पडत आहे. मात्र, पावसामुळे कोपरी भागात असलेली 35 वर्षे जुनी, तीन मजली असलेल्या गायत्री इमारतीचा गॅलरीचा भाग कोसळला आहे. ही इमारत आधीच धोकादायक असल्यामुळे रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, जोरादार पाऊस नासल्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचायचे थांबले आहे. पावसामुळे शहरातील वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही, मात्र शहरातील काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.