मुंबई - कोरोनाचे मुंबईत आज 995 नवे रुग्ण आढळून आले असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 3 हजार 262 वर पोहोचला आहे, तर मृतांचा आकडा 5 हजार 814 वर पोहोचला आहे. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 71 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 59 दिवसांवर पोहोचला आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 62 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 46 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 44 पुरुष तर 18 महिला रुग्ण आहेत. मुंबई आज 905 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 73 हजार 555 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 3 हजार 262 रुग्ण आहेत. तर 5 हजार 814 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 23 हजार 893 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 654 चाळी आणि झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आले असून त्या सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6 हजार 87 इमारती व इमारतींच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी 4 लाख 43 हजार 83 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.