बीड - जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने पाठविण्यात आलेले 470 पैकी 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बीड शहरातील 7, परळी 6, माजलगाव 1, अंबाजोगाई 2, आष्टी 1 तर गेवराई येथील दोघा जणांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने कोरोना तपासणीची गती वाढवली आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये तालुक्यतील माळीवेसमधील 1, शाहूनगरमधील 1, लिंबा (ता. बीड) येथील 1 यासह बीड शहरातील इतर 4 रुग्णांचा समावेश आहे. तर परळीच्या भीमनगर, सिद्धार्थ नगर, इंदीरा नगर, जुने रेल्वे स्टेशन येथील प्रत्येकी 1 रुग्ण तर गेवराईच्या तलवाडा येथील 1 आणि गेवराई शहराच्या रंगार चौक येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.
तसेच, आष्टी शहराच्या दत्त मंदिर गल्ली भागातील 1 तर अंबाजोगाईच्या विमल सृष्टीमधील 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. माजलगाव तालुक्याच्या जदीद जवळ 1 जण पॉझिटिव्ह आढळला आहे. सध्या बीड शहरासह इतरत्र (परळी शहर वगळता) अनलॉक आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाने केले आहे. आज घडीला जिल्ह्यात 141 अॅक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सव्वाशेहून अधिक रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.