ETV Bharat / briefs

महावितरणच्या भांडूप परिमंडळातील 10 लाख 55 हजार ग्राहकांनी भरले 300 कोटींचे वीजबिल - Bhandup electricity circle

जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष मीटर रिडींग जूनमध्ये घेण्यात आले तेव्हा एप्रिल, व मे महिन्यात साचलेल्या एकत्रित रिडींगची नोंद झाली व त्यानुसार सरासरी प्रमाणे दिलेले वीजबिल रिडींग वजा करून, राहिलेले वीजबिल देण्यात आले. जे मिटर रिडींगनुसार अचूक आहे. तसेच 3 महिन्याचा स्लॅब बेनिफिटसुद्धा ग्राहकांना देण्यात आला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Bhandup electricity bill payment
Bhandup electricity bill payment
author img

By

Published : Jul 9, 2020, 5:18 PM IST

मुंबई - लॉकडाऊननंतर जून महिन्यात प्रत्यक्ष मीटर रिडींग घेतल्यानंतर दिलेले वीजबिल अचूक असून या संबंधी महावितरणच्या भांडूप परिमंडळातील ग्राहकांना वेबिनार, ग्राहक शिबीर, मोबाईल, तसेच प्रत्यक्ष संवाद साधून वीजबिलाबाबत माहिती देण्यात येत आहे. या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विश्लेषणावर ग्राहक समाधानी असून भांडुप परिमंडळातील 10 लाख 55 हजार ग्राहकांनी जून महिन्याचा 300 कोटी रुपयांचा वीजबिल भरणा केला असल्याची माहिती भांडूप परिमंडळच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 23 मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने या काळात महावितरणसह, राज्यातील सर्व वीज वितरण कंपनींना कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मीटर रिडींग न घेता सरासरी रिडींग प्रमाणे ग्राहकांना वीजबिल देण्याबाबत निर्देश दिले होते. कोरोना संसर्ग व प्रसार होऊ नये म्हणून एप्रिल व मेमध्ये रिडींग बंद झाल्यामुळे, राज्यातील लघुदाब ग्राहकांना एप्रिल व मे या महिन्याचे वीजबिल, हिवाळ्यातील डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या 3 महिन्याच्या सरासरी वीजवापरानुसार देण्यात आले होते.

एप्रिल व मे महिन्यात उन्हाळा असून ग्राहकांचा वीजवापर नेहमीप्रमाणे जास्त असतो. परंतु, यावेळी लॉकडाऊन असल्यामुळे सर्व जण घरी होते. त्यामुळे टीव्ही, पंखा, एअर कंडिशन, फ्रीझचा वापर अजून जास्त होता. लॉकडाऊनमुळे लोक घरातून काम करत असल्यामुळे त्यांच्या लॅपटॉप, कॉम्प्युटरचा वापरही नेहमीपेक्षा जास्त होता. जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष मीटर रिडींग जूनमध्ये घेण्यात आले तेव्हा एप्रिल, व मे महिन्यात साचलेल्या एकत्रित रिडींगची नोंद झाली व त्यानुसार सरासरी प्रमाणे दिलेले वीजबिल रिडींग वजा करून, राहिलेले वीजबिल देण्यात आले. जे मिटर रिडींगनुसार अचूक आहे. तसेच 3 महिन्याचा स्लॅब बेनिफिटसुद्धा ग्राहकांना देण्यात आला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

काही ग्राहकांनी एप्रिल व मे महिन्याचे सरासरी वीज बिल ऑनलाईन भरले होते. परंतु, काही ग्राहकांनी एप्रिल व मे महिन्याचे वीजबिल, लाॅकडाऊनमुळे कॅश कलेक्शन सेन्टर बंद असल्यामुळे भरले नाहीत, म्हणून त्यांना जूनमध्ये वीजबिलाची थकबाकीची रक्कम जोडून आल्यामुळे विजबिल अजून जास्त दिसत आहे.

लॉकडाऊनच्या काळात सुद्धा महावितरणने ग्राहकांना उत्तम सेवा दिली आहे. परंतु, जून महिन्याच्या बिलाविषयी ग्राहकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण होत आहेत. म्हणून ग्राहकांना वरील प्रमाणे वस्तुस्तिथी समजावून सांगण्यासाठी वेबिनार, मदत कक्ष इत्यादी माध्यमांद्वारे त्यांच्या शंकाचे निरसन करण्याची व्यवस्था महावितरणने केली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, जून महिन्याच्या बिलाचे भांडूप परिमंडलात 10 लाख 55 हजार ग्राहकांनी 300 कोटी रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार, ग्राहकांना जून महिन्याच्या वीजबिलाची रक्कम एकत्रित भरणे शक्य नसल्यास, तीन समान हफ्त्यात भरण्याची सवलत सुद्धा दिली आहे. तसेच जून महिन्याचे एकत्रित वीजबिल एकरकमी भरणाऱ्या घरघुती वीज ग्राहकांना वीजबिलात प्रचलित 1 टक्क्याऐवजी 2 टक्के सवलत देण्यात येत आहे. ज्या ग्राहकांनी त्यांचे संपूर्ण वीजबिल (थकबाकीसह) देय दिनांकापर्यंत भरले तर त्यांना जून महिन्याचा चालू वीज देयकाच्या रकमेचा 2% परतावा जुलै महिन्याच्या वीज बिलातून करण्यात येईल.

कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्यामुळे ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी उपविभागीय कार्यालयात गर्दी करण्याचे टाळावे. आपल्या जवळच्या वीजबिल भरणा केंद्रात किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून वीजबिल भरणा करावा, असे आवाहन महावितरण करत आहे. ज्या ग्राहकांनी अजून त्यांचे जून महिन्याचे वीजबिल भरले नाहीत, त्यांनी आपले वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहनसुद्धा भांडूप परमंडळच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.