ETV Bharat / briefs

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानात जळगावात आढळले जुन्या आजारांचे रुग्ण - Jalgaon corporation news

जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महापालिका क्षेत्रात आरोग्य विभाग तर 18 नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रांत स्थानिक आरोग्य विभागामार्फत 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत, 1 लाख 9 हजार 519 जुन्या विकारांचे (कोमॉर्बिड) रुग्ण आढळून आले आहे.

1 lakh 10 thousand patients with chronic diseases found in Jalgaon district in 'My Family, My Responsibility' campaign

author img

By

Published : Oct 6, 2020, 5:50 PM IST

Updated : Oct 6, 2020, 6:17 PM IST

जळगाव - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानात जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 12 हजार 477 कुटूंबांतील 34 लाख 81 हजार 169 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 1 लाख 9 हजार 519 जुन्या विकारांचे (कोमॉर्बिड) रुग्ण आढळून आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार, जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महापालिका क्षेत्रात आरोग्य विभाग तर 18 नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात स्थानिक आरोग्य विभागामार्फत हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे 2 हजार 533 पथके, नगरपालिका क्षेत्रांमध्ये 280 तर महापालिका क्षेत्रात 134 असे एकूण 2974 पथके कार्यरत आहेत. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. आरोग्य विभागाचे हे पथक नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची तपासणी करीत आहेत. यामध्ये कुटुंबातील सदस्याचे शारीरिक तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का ,याची माहिती घेत असून ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणांची तपासणी करीत आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकांनी आतापर्यंत 6 लाख 53 हजार 673 कुटुंबांना भेट दिली असून या कुटुंबातील 27 लाख 7 हजार 311 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. या तपासणीत आरोग्य पथकांना 78 हजार 210 जुन्या विकारांचे, सारीचे 555 तर सर्दी, खोकला, ताप (ILI) आदीचे 6 हजार 332 रुग्ण आढळले आहेत. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या संशयितांची तपासणी करून 9 हजार 339 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. यापैकी 887 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर 18 नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील 68 हजार 888 कुटुंबातील 4 लाख 68 हजार 36 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 20 हजार 529 जुन्या आजारांचे रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 683 संशयित व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले यापैकी 339 व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या आहेत. त्याचप्रमाणे, महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 89 हजार 916 कुटुंबातील 3 लाख 5 हजार 822 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 10 हजार 780 जुन्या आजारांचे रुग्ण आढळले आहेत. तर सारीचे 18, सर्दी, खोकला, तापाचे 179 रुग्ण आढळले आहे. यापैकी 166 व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते तर 86 संशयितांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.

Last Updated : Oct 6, 2020, 6:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.