ETV Bharat / bharat

Woman Broke Thief Finger: चोराचे बोट दाताने तोडून 'तिने' गाठले पोलीस ठाणे; महिलेच्या धाडसाचे होतेय कौतुक

author img

By

Published : Feb 5, 2023, 10:07 PM IST

उत्तर प्रदेशात दरोड्याच्या विविध घटना घडत आहेत. यामध्ये आरोपीला पोलिसांकडून अटक केली जात आहे. मात्र, महिलेचा दागिना चोरायला आलेल्या चोराला असे करणे चांगलेच अंगलट आले. या प्रकरणात महिलेने चोराचे बोट दाताने तोडून टाकले. यानंतर ती बोट घेऊन चक्क पोलीस ठाण्यात पोहोचली. उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे ही घडना घडली. नागरिकांनी महिलेच्या या धाडसाचे कौतुक केले.

Woman Broke Thief Finger
महिला तिची आपबिती सांगताना
चोराचे बोट कसे तोडले याविषयी सांगताना महिला

कौशांबी (यूपी): ही घटना यूपीतील करारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. म्योहर गावातील रहिवासी श्रीचंद रायदास यांची पत्नी नीता देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला संध्याकाळी म्योहर बाजारातून भाजी घेऊन पायी परतत होती. निर्जन रस्त्यावर एका इसमाने तिच्या पाठीवर मागून वार करत गळ्यातील मंगळसूत्र हिसकाविण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केली असता आरोपीने तिचे तोंड बंद करण्याचाही प्रयत्न केला. नेमके याच दरम्यान चोराचे बोट महिलेच्या तोंडात अडकले. त्याने ते काढण्याचा प्रयत्न केला. पण, तो अपयशी ठरला. अखेर धाडस दाखवत त्याने आपले बोट कापले. आरोपीचे बोट महिलेच्या तोंडात राहिले. बोट गमावल्याने आरोपी थरथरू लागला. इतर गावकरी घटनास्थळी पोहोचेपर्यंत रक्तबंबाळ झालेल्या आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

तोडलेले बोट घेऊन गाठले पोलीस ठाणे : आरोपीने चेन स्नॅचिंग करताना महिलेच्या चेहऱ्याला ओरबडून गंभीर दुखापत केली. यानंतर शनिवारी महिलेने आरोपीचे तोडलेले बोट घेऊन पोलीस ठाणे गाठले. महिलेच्या हातातील बोट कापलेले पाहून पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. महिलेने पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली तेव्हा सर्वांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. पीडित महिलेने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी पत्रात म्हटले आहे की, तिचे सोन्याचे लॉकेट, तोरड्या आणि ४ हजार रुपये हिसकावून आरोपी फरार झाला. सीओ मंझनपूर योगेंद्र कृष्ण नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला तुटलेले बोट घेऊन करारी पोलिस ठाण्यामध्ये पोहोचली होती. अज्ञात व्यक्तीने तिच्यावर हल्ला केल्याचे तिने सांगितले. महिलेने स्वत:च्या बचावासाठी आरोपीचे बोट तोडून वेगळे केले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला जात आहे.

भाजप नेत्याची क्रूर हत्या : विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठी घटना घडवली आहे. भाजप नेते नीलकंठ कक्केम यांची सगळ्या गावासमोर जाहीरपणे हत्या करून दहशत पसरवण्याचे काम नक्षलवाद्यांनी केले आहे. नीलकंठ कक्केम हे उसूर मंडळाचे भाजप अध्यक्ष होते. गेली 15 वर्षे ते या पदावर होते. ही घटना घडवून आणल्यानंतर नक्षलवाद्यांनी पत्रक फेकून या हत्येची जबाबदारी घेतली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे.

कुऱ्हाडीने केला शिरच्छेद: नक्षलवाद्यांनी रविवारी ही घटना घडवली. नीलकंठ कक्केम हे आपल्या मेहुणीच्या लग्नासाठी आवपल्ली या मूळ गावी गेले होते. यादरम्यान नक्षलवाद्यांनी येऊन भाजप नेत्याची कुटुंबासमोर हत्या केली. माओवाद्यांनी कुऱ्हाडीने भाजप नेते नीलकंठ कक्केमचा शिरच्छेद केला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : Jitendra Awhad tweet On Ramayana: रावण काढून रामायणातला राम समजावून सांगा; आव्हाडांचे नवे ट्विट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.