ETV Bharat / bharat

1 नोव्हेंबरपासून 43 स्मार्टफोन्समध्ये चालणार नाही WhatsApp, तुमचा फोन कोणता? - व्हॉट्सअ‍ॅप न्यूज

व्हॉट्सअ‍ॅप आज जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे. तरुण असो की वृद्ध, प्रत्येकजण व्हॉट्सअ‍ॅप वापरतो. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱयांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून व्हॉट्सअ‍ॅप 43 स्मार्टफोन मॉडेल्सवर चालणार नाही.

WhatsApp
व्हॉट्सअ‍ॅप
author img

By

Published : Sep 6, 2021, 2:07 PM IST

नवी दिल्ली - आपण सगळेच संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहून आपण व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एकमेकांशी संपर्क साधू शकतो. व्हॉट्सअ‍ॅप आज जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे. तरुण असो की वृद्ध, प्रत्येकजण व्हॉट्सअ‍ॅप वापरतो. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱयांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून व्हॉट्सअ‍ॅप 43 स्मार्टफोन मॉडेल्सवर चालणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपने यावर्षी अनेक नवीन फीचर्स अ‍ॅपमध्ये जोडले आहेत. अ‍ॅप सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने जुन्या स्मार्टफोन्सचा निरोप घेण्याचे ठरवले आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. त्यामुळे तुमचा फोन जर या 43 फोनच्या यादीत असेल, तर नवा फोन घेणे योग्य ठरेल. कारण, एकदा का व्हॉट्सअ‍ॅपने सपोर्ट बंद केला तर तुमची चॅट हिस्ट्री देखील तुम्हाला वापरता येणार नाही.

या फोनवर व्हॉट्सअॅप चालेल -

  • अँड्रॉइड ओएस 4.1 आणि त्यानंतरचे स्मार्टफोन्स
  • iOS 10 आणि त्यानंतरचे आयफोन्स
  • काही निवडक KaiOS 2.5.1 आणि त्यानंतरचे स्मार्टफोन्स, ज्यात JioPhone आणि JioPhone 2 चा समावेश आहे

व्हॉट्सअ‍ॅप या स्मार्टफोनला सपोर्ट करणार नाही -

१ नोव्हेंबरपासून अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मच्या काही जुन्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही.

अॅपल

आयफोनच्या एसई, 6s आणि 6s प्लसवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.

सॅमसंग

सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाइट, गॅलेक्सी ट्रेंड II, गॅलेक्सी एस 2, गॅलेक्सी एस 3 मिनी, गॅलेक्सी एक्सकव्हर 2, गॅलेक्सी कोर आणि गॅलेक्सी एस 2वरही व्हॉट्सअ‍ॅप काम करणं बंद करेल.

सोनी

सोनी एक्सपीरिया मायरो, सोनी एक्सपीरिया नियो एल आणि सोनी एक्सपीरिया आर्क एस.

हुआवेई

हुआवेई असेंड जी740, असेंड मेट, हुआवेई असेंड डी क्वॉड एक्सएल, असेंड पी1 एस आणि असेंड डी2.

जेडटीई

जेडटीई ग्रँड एस फ्लेक्स, जेडटीई व्ही956, ग्रँड एक्स क्वॉड व्ही986, ग्रँड मेमो.

इतर

अल्काटेल वन टच इव्हो 7 हँड-ऑन, अर्कोस 53 प्लॅटिनम, एचटीसी Desire 500, Caterpillar कॅट बी 15, विको सिंक फाइव्ह, विको डार्कनाइट, लेनोवो ए820, यूएमआय एक्स 2, Faea एफ 1 आणि टीएचएल डब्ल्यू 8.

हेही वाचा - video : व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी पॉलिसीवरून मजेशीर मीम्स व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.