ETV Bharat / bharat

Vice President Election : जगदीप धनखड भारताचे नवे उपराष्ट्रपती - एनडीए उमेदवार जगदीप धनखड

देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक ( Vice President Election ) होत असून मतदान झाले आहे. एनडीए उमेदवार जगदीप धनखड ( NDA candidate Jagdeep Dhankhad ) व युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा ( UPA candidate Margaret Alva ) यांच्यामध्ये उपराष्ट्रपतीपदासाठी लढत होत आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार निवडणुकीत आज मतदान ( loksabha rajyasabha mp will vote ) करतील. जगदीप धनखड आघाडीवर आहे. काही वेळात निकाल हाती येणार आहे

Vice President Election Voting
Vice President Election Voting
author img

By

Published : Aug 6, 2022, 10:23 AM IST

Updated : Aug 6, 2022, 7:52 PM IST

नवी दिल्ली - देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीचे मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात पोहोचले असून त्यांनी आपले मतदान केले आहे. एनडीचे उमेदवार जगदीप धनखड ( NDA candidate Jagdeep Dhankhad ) व युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा ( UPA candidate Margaret Alva ) यांच्यामध्ये उपराष्ट्रपतीपदासाठी लढत होत आहे. खासदार, आमदार या निवडणुकीत आज मतदान ( MP MLA Will Vote ) करतील. संसदेतील सदस्यांचे बलाबल पाहता भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय सहज मानला जात आहे.

उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू, पंतप्रधानांनी केले मतदान

आज मिळणार नवा उपराष्ट्रपती : आज देशाला नवा उपराष्ट्रपती मिळणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर आणि मार्गारेट अल्वा यांच्यात लढत आहे. मतमोजणी सुरू झाली आहे. आता निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. त्याचवेळी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर यांचा विजय निश्चित मानला जात असल्याने भाजपचे कार्यकर्ते आतापासून जल्लोष करत आहेत. त्याचबरोबर भाजप कार्यालयातही जल्लोषाची जय्यत तयारी सुरू आहे. नवे उपराष्ट्रपती 11 ऑगस्ट रोजी पदाची शपथ घेतील.

धनखरांना मिळणार विक्रमी मताधिक्य : देशात आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले असून मतमोजणी सुरू झाली आहे. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखर हे पश्चिम बंगाल गेस्ट हाऊसमधून त्यांच्या कारमधून निघून प्रल्हाद जोशी यांच्या घरी पोहोचले आहेत. जगदीप धनखर नेतृत्व करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. येथे केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाबद्दल आत्मविश्वासाने दिसले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत ते म्हणाले, "मला तपशिलात जायचे नाही. मी एवढेच सांगू शकतो की आमचे उमेदवार जगदीप धनखर विक्रमी मताधिक्याने विजयी होतील."

एनडीचे उमेदवार जगदीप धनखड - राजस्थानमधून आलेले जगदीप धनखड हे सत्ताधारी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे ( NDA candidate Jagdeep Dhankhad ) उमेदवार आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांचे राजकीय कार्यक्षेत्र राजस्थान असून ते झुंझुनूचे रहिवासी आहेत. लोकसभा आणि राज्यसभेचे अध्यक्ष राजस्थानमधून येण्याची ही पहिलीच वेळ असेल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा येथून खासदार आहेत. तर राज्यसभेत सभापती हे उपराष्ट्रपती असतात.

युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा - उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या उमेदवार म्हणून मार्गारेट अल्वा ( UPA candidate Margaret Alva ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मार्गारेट अल्वा यांना काँग्रेससह इतर प्रमुख राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. तथापि, तृणमूल काँग्रेसने मात्र उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून स्वतःला दूर ठेवले आहे. या पक्षाचे सदस्य मतदान करणार नाहीत. त्यामुळे जगदीप धनखड ( NDA candidate Jagdeep Dhankhad ) यांचे पारडे अधिक जड झाले आहे. त्यामुळे ते उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहज विजयी होतील असे मानले जात आहे.

हेही वाचा - Shinde Government Cabinet Expansion : राज्यात मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे वर्ग, मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदे सरकारची कसरत

Last Updated : Aug 6, 2022, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.