नवी दिल्ली - कोरोनाविरोधातील लढाईत काल देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला गेला होता. त्यानिमित्त देशभरात काल विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करत जनतेच्या सहकार्यानेच हा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्याचे आभार मानत देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान -
देशाने काल 100 कोटी डोजचा टप्पा पार केला आहे. हा सर्व भारतीयांसाठी एक आनंदाचा क्षण आहे. जनतेच्या सहकार्यानेच हा महत्त्वपूर्ण टप्पा पार झाला. १०० कोटी लसीचे डोस हा केवळ आकडा नसून देशाच्या सामर्थ्याचे प्रतिक आहे. भारताने ज्या गतीने १०० कोटींचा टप्पा ओलांडला त्याचे जगभरातून कौतुक होत आहे. कोरोनाच्या सुरुवातीला भारताचे कसे होईल, असा प्रश्न अनेकांना पडला होता. भारत या परिस्थितीचा सामना करु शकेल का, लस खरेदीसाठी भारत पैसे कुठून आणेल, भारत देशातील लोकांचे लसीकरण कसे करेल, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, आज हा १०० कोटी डोस प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. भारताने आपल्या नागरिकांना १०० कोटी लसीचे डोस मोफत दिले आहे, असे पंतप्रधांनी म्हटले.
पुढे बोलताना ते म्हणाले, हे एक नवीन भारताचे चित्र आहे. आज अनेक जण भारताच्या लसीकरणाची तुलना जगातील इतर देशांशी करत आहेत. भारतात लसीकरणात कोणातीही भेदभाव न करता, सर्वांचे सामान्य माणसाप्रमाणे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच भारताचा संपूर्ण लसीकरण कार्यक्रम वैज्ञानिक आधारावर विकसीत झाला असल्याचेही ते म्हणाले.
भारताची लोकशाही म्हणजे सबका साथ सबका विकास, असे पुर्नउच्चारही त्यांनी केला. तसेच भारताने मेक इन इंडियाचे परिणाम अनुभवले असून येत्या सणासुदीच्या काळात देशावासियांनी स्वदेशी वस्तुंना प्राधान्या द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
16 जानेवारीपासून सुरू झाली लसीकरण मोहीम -
देशात कोरोना लसीकरण मोहीम जानेवारी 2021 मध्ये सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय कोविड -19 लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा सुरू केला. ऑक्सफोर्ड, अॅस्ट्राझेनेका आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोवाशील्डच्या आपत्कालीन वापरास सरकारने मंजुरी दिली होती. 18 सप्टेंबर रोजी देशभरात लसीचे 25 दशलक्ष डोस देण्यात आले. लस देण्यासाठी देशभरात 52,088 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी 50,056 सरकारी केंद्रे आहेत, जिथे मोफत लस दिली जात आहे. तर 2,032 खाजगी आहेत.
लसीकरणातील पहिले पाच राज्य -
- उत्तर प्रदेश - 12,21,40,914
- महाराष्ट्र - 9,32,00,708
- पश्चिम बंगाल - 6,85,12,932
- गुजरात - 6,76,67,900
- मध्य प्रदेश - 6,72,24,286
हेही वाचा - आरपीएफ महिला जवानाने वाचवला महिला प्रवाशाचा जीव; स्टॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकातील थरारक घटना