लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाचे (@CMOfficeUP) ट्विटर हँडल ८ एप्रिलच्या रात्री हॅक करण्यात आले होते. CM कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक झाल्याच्या ४८ तासांनंतर उत्तर प्रदेश सरकार @UPGovt चे ट्विटर हँडल हॅक (UP Government Twitter AC Hacked) करण्यात आले आहे. हॅकरने स्वतःला @Azukiofficial चा सह-संस्थापक असल्याचे सांगितले आहे. या संदर्भात सायबर यूपीचे एसपी त्रिवेणी सिंह यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. त्याचवेळी माहिती विभागाचे फॅक्ट चेक ट्विटर हँडलही हॅक झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सुरुवातीला CM कार्यालयाचे ट्विटर हॅडल झाले होते हॅक - मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालय @CMOfficeUP चे अधिकृत ट्विटर हँडल हॅकरने 8 एप्रिलच्या रात्री 12:40 वाजता हॅक केले. हॅकर्सनी बायोमध्ये स्वतःचे वर्णन @BoredApeYC आणि @yugalabs चे सह-संस्थापक म्हणून केले आहे. या दोन्ही कंपन्या क्रिप्टोकरन्सीशी संबंधित आहेत. त्याचवेळी या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर अधिकाऱ्यांनी ट्विटरसोबत संपर्क साधला होता. यानंतर 30 मिनिटांनंतर, खाते पुन्हा सुरू करण्यात आले.