ETV Bharat / bharat

केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी कुतुबमिनारच्या उत्खननाचा दावा फेटाळला

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी ( JK Reddy on Qutub Minar complex excavation claim ) यांनी रविवारी कुतुब मिनारच्या उत्खननाबाबत प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचे खंडन केले. मंत्रालयाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे रेड्डी म्हणाले.

Qutub Minar
कुतुबमिनार
author img

By

Published : May 23, 2022, 9:55 AM IST

नवी दिल्ली - केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी ( JK Reddy on Qutub Minar complex excavation claim ) यांनी रविवारी कुतुब मिनारच्या उत्खननाबाबत प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचे खंडन केले. मंत्रालयाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे रेड्डी म्हणाले.

हेही वाचा - Pramod Sawant big statement - ज्ञानवापी प्रकरणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले नष्ट केलेली सर्व मंदिरे पुन्हा बांधावीत

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने या ऐतिहासिक वास्तूची आयकोनोग्राफी आणि उत्खनन करण्याचे आदेश पारित केले आहेत, तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण लवकरच या आदेशांवर काम सुरू करेल, असे वृत्त अनेक प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्यावर रेड्डी यांनी सदर प्रतिक्रिया दिली.

सांस्कृतिक सचिव गोविंद सिंग मोहन आणि अधिकार्‍यांच्या टीमने स्मारकाला नुकत्याच दिलेल्या भेटीमुळे ही अटकळ बांधली गेली असावी. दुसरीकडे,कुतुब मिनार कुतुब-अल-दीन ऐबकने बांधले नव्हते, तर राजा विक्रमादित्य यांनी सूर्याच्या दिशेचा अभ्यास करण्यासाठी बांधले होते, असा दावा एएसआय चे माजी प्रादेशिक संचालक धरमवीर शर्मा यांनी केला होता. शिवाय, कुतुबमिनार हा 'विष्णूस्तंभ' होता आणि विदेशी इस्लामिक आक्रमकांनी डझनभर जैन-हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली होती आणि तेथे मशीद बांधली होती, असा दावा विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) प्रवक्ते विनोद बन्सल यांनी देखील केला होता.

सर्व अंदाजांना रेड्डी यांनी नकारले आहे. कुतुंब मिनारच्या खोदकामाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगत प्रसारमाध्यमांचा दावा रेड्डी यांनी खोडून काढला आहे.

हेही वाचा - Gold silver rate 23 may : सोन्याच्या दरात वाढ.. जाणून घ्या आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.