ETV Bharat / bharat

Amit Shah Bihar Visit : बिहारमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा आणखी एक कार्यक्रम रद्द

author img

By

Published : Apr 2, 2023, 8:50 AM IST

गृहमंत्री अमित शाह यांचा बिहारमधील दुसरा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. सासाराम दौऱ्यावरून बिहारमध्ये आधीच राजकारण तापले आहे. अशात देशाच्या गृहमंत्र्यांचा आणखी एक कार्यक्रम रद्द झाल्याने बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. भाजपने यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दोषी ठरवले आहे.

Amit Shah Bihar Visit
अमित शाहंचा बिहार दौरा
अमित शाहंचा बिहारमधील आणखी एक कार्यक्रम रद्द

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बिहार दौरा सध्या चर्चेत आहे. बिहारच्या सासाराममध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित त्यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. आता 2 एप्रिल रोजी सासाराम आणि पाटणा येथील एसएसपी परिसरात सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आलेला कार्यक्रमही शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आला आहे.

कार्यक्रम रद्द होण्याचे कारण अस्पष्ट : या कार्यक्रमांतर्गत भारत सरकारकडून सशस्त्र सीमा बाल फ्रंटियर पाटणा या इमारतीच्या बांधकामासाठी भूमिपूजन आणि 9 नव्याने बांधण्यात आलेल्या आस्थापनांचे उद्घाटन होणार होते. हा कार्यक्रम का रद्द करण्यात आला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. विशेष म्हणजे कलम 144 लागू झाल्यामुळे सासाराममधील कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. परंतु, नंतर कलम 144 चा मुद्दा प्रशासनाने फेटाळला.

सासाराममधील कार्यक्रमही पुढे ढकलला : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. अमित शाहंना दोन मोठ्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते. 2 एप्रिल रोजी सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त सासाराम येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. पण, जातीय हिंसाचार आणि सासाराममध्ये कलम 144 लागू झाल्यामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. प्रशासनाने सुरक्षा देण्यास नकार दिल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. मात्र, मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, राज्य सरकार केंद्रातील सर्व मंत्र्यांना सुरक्षा पुरवते.

'नितीश सरकार गृहमंत्र्यांचा कार्यक्रम रोखत आहे': गृहमंत्री अमित शाह यांचे बिहारमधील पूर्वनियोजित कार्यक्रम एकामागून एक रद्द होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी म्हणाले की, 'बिहारमधील महाआघाडीचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे घाबरले आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांना कार्यक्रम करण्यापासून रोखले जात आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना काही कळत नाही. ते फक्त खोटी विधाने करतात.

सासाराम आणि नालंदा हिंसाचारात अनेक जखमी : काल सायंकाळी नालंदामध्ये पुन्हा हिंसाचार उसळला. या हिंसाचाराला नियंत्रित करण्यात पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. सासाराम येथे झालेल्या स्फोटात 6 जण जखमी झाले आहेत, तर नालंदामध्ये 2 जणांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. सर्व जखमींची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयांमध्येही त्यांची योग्य काळजी घेतली जात नसल्याची माहिती आहे.

हेही वाचा : Rahul Gandhi Home : काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याने राहुल गांधींच्या नावे केले त्यांचे घर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.