ETV Bharat / bharat

'तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते, तर सत्ता लालूनींच चालवली असती' - बिहार निवडणूक निकाल

बिहार निवडणुकीमध्ये 'मॅन ऑफ द मॅच' ठरलेले तेजस्वी यादव यांचे भाजप नेत्या उमा भारती यांनी कौतूक केले आहे. तर तसेच त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू यादव यांच्यावर टीका केली. 'तेजस्वी उत्तम नेता आहेत. मात्र, सत्ता चालवण्यासाठी त्यांनी आणखी परिपक्व होण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. जर तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते, तर सत्ता लालूनींच चालवली असती आणि राज्यात पुन्हा जंगलराज आले असते, असेही त्या म्हणाल्या.

भाजप नेत्या उमा भारती
भाजप नेत्या उमा भारती
author img

By

Published : Nov 12, 2020, 7:24 AM IST

पाटणा - कोरोना महामारीत पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून एनडीएला बहूमत मिळाले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी एकहाती प्रचार करत, एनडीएसमोर तगडं आव्हान निर्माण केलं. तेजस्वी यादव यांच्या यशावर भाजप नेत्या उमा भारती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'तेजस्वी उत्तम नेता आहेत. मात्र, सत्ता चालवण्यासाठी त्यांनी आणखी परिपक्व होण्याची गरज आहे. तेजस्वी बिहार चालवू शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना वाट पाहावी लागणार आहे', असे उमा भारती यांनी म्हटलं. याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू यादव यांच्यावर निशाणा साधला. जर तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते. तर सत्ता लालूनींच चालवली असती आणि राज्यात पुन्हा जंगलराज आले असते, अशी टीका त्यांनी केली.

तेजस्वी यादव यांचे उमा भारती यांनी केले कौतूक

नियंत्रण लालूंचेच असते

राज्यात महागठबंधनचे सरकार आले असते. तर त्यावर सर्व नियत्रंण लालूंचे राहिले असते. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा जंगलराज आले असते. तसेच तेजस्वी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या घरात वाद-विवाद झाला असता. अशात ते बिहारचा विकास करू शकले नसते. सत्ता चालवण्यासाठी त्यांनी आणखी परिपक्व होण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी मध्य प्रदेश पोटनिवडणुकीवरही भाष्य केले. कमलनाथ यांनी चांगल्या प्रकारे निवडणूक लढवली. जर त्यांनी याच प्रकारे सरकार चालवले असते तर अडचणी आल्या नसत्या. ते एक सभ्य व्यक्ती असून मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनी चतुराईने ही निवडणूक लढवली, असे उमा भारती म्हणाल्या.

एनडीएला स्पष्ट बहूमत -

बिहारमध्ये एनडीएला 125 असे स्पष्ट बहूमत मिळाले असून भाजपने 74, जनता दल (यु) 43 तर हिंदुस्तान आवाम मोर्चा (सेक्युलर) आणि विकासशील इन्सान पार्टीने प्रत्येकी 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर महागठबंधनने 110 जागांवर चमकादार कामगिरी केली. यात आरजेडीला 75, काँग्रेस 19, सीपीआय (माले) 12 ,सीपीएम आणि सीपीआयला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत. याचबरोबर एमआयएमला 5 जागा मिळाल्या आहेत. तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला. बहूमतासाठी 122 ही म‌ॅजिक फिगर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.