- मुंबई - शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडी शनिवारी तळोजा कारागृहात सचिन वाझेचा जबाब नोंदवणार आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयाने ईडीला जबाब नोंदवण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, सचिन वाझेच्या जबाबात अन्य मंत्र्यांची देखील नाव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदेनंतर भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी केली जाणार आहे. येत्या 2 ऑगस्ट रोजी पवारांची आयोगाकडून चौकशी केली जाणार आहे. सविस्तर वाचा..
- ठाणे : येथील मीरारोडमध्ये गुरुवारी दुपारी गाडीला जॅमर लावल्याने तरूणाने पोलिसाला धमक्या देत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सविस्तर वाचा..
- पुणे - चिंचोडी- लांडेवाडी ता.आंबेगाव येथील इशान्वी बाळासाहेब आढळराव पाटील या चिमुरडीने सर्वात जलद गतीने सर्व देशांचे झेंडे ओळखून, त्यांच्या राजधान्या पाठ करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. सविस्तर वाचा..
- अकोला - शेगाव येथून देवदर्शन आटोपून परत येत असलेल्या भाविकांच्या कारला एका आयशर टेम्पोने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये चार युवक ठार झाले आहेत. अपघाताची ही घटना अकोला शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पहाटेच्या सुमारास घडली आहे. सविस्तर वाचा..
- वाशिम - सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी जिल्ह्यात अष्टसूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याविषयीची माहिती अभिनेता आमिर खान यांना मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार यांना आपल्या निवासस्थानी बोलावून यासंदर्भात माहिती घेतली. सविस्तर वाचा..
- मुंबई - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला असून त्यात १२ मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते रवीशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनाही मोदी मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे, तर डॉ. हर्षवर्धन यांचाही आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यासोबतच स्मृती इराणी यांच्याकडील वस्त्रोद्याग, पीयूष गोयल यांच्याकडूनही रेल्वे खाते काढून घेण्यात आले आहे. यावर शिवसेनेने चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्या होत्या अशी खरमरीत टिप्पणी केली आहे. सविस्तर वाचा..
- कोल्हापूर - नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना पहिल्यांदाच केंद्रामध्ये सहकार मंत्रालय बनविण्यात आले असून, अमित शाह हे आता केंद्रीय सहकार मंत्री असणार आहेत. अनेकांनी या सहकार मंत्रालयाचे स्वागत केले असून राज्यांचे अधिकार मात्र अबाधित राहिले पाहिजे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने ईटीव्ही भारतने केलेला हा विशेष रिपोर्ट.. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर समावेश झालेल्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कोरोनाच्या काळात कोणत्याही मंत्र्यांनी जल्लोष करू नये, असे पंतप्रधानांनी निर्देश दिले आहेत. सुत्राच्या माहितीनुसार मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीमध्ये थांबण्याचेही निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. सविस्तर वाचा..
- मुंबई - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची चौकशी पूर्ण झाली आहे. तब्बल 9 तास ईडीने खडसे यांची चौकशी केली आहे. एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांची मुलगी देखील उपस्थित होती. चौकशीला सहकार्य करणार आहे. पुढे अजून चौकशीला बोलावले नाही. मात्र, पुन्हा बोलावले तर चौकशीला हजर राहणार असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. सविस्तर वाचा..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या - ईटीव्ही भारत टॉप टेन
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना, पाऊस यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या

Last Updated : Jul 9, 2021, 1:05 PM IST